फॅमिली क्रॉनिकल्स

फॅमिली क्रॉनिकल्स ८ : उन्हाळी सुट्टी

शाळेचं अजून एक वर्ष सरलं...उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्या. घरातला छोट्यांचा कंपू अफ्फाट खूष तर बाकीचे दोन जीव पुढील दोन महिन्याभर गुदरणार्‍या संकटाच्या चाहूलीने हताश! गेला महिनाभर छोटे कंपनीचं काऊंट डाऊन चालू होतं ते काम आता मोठ्यांकडे लागतं...सुट्टी कधी संपणार याचं काऊंट डाऊन चालू करायचं. बच्चे कंपनीचं काऊंट डाऊन खरं तर शाळा सुरु झाल्या दिवशीच चालू होतं. नविन शाळा-वर्षाचं नविन कॅलेंडर हाती आलं की आधी सुट्ट्या बघून घ्यायच्या आणि मग शाळा संपायला किती दिवस आहेत ते मोजून घ्यायचं...हे पहिलं काम!

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ७ : खरेदी आख्यान

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------

Keywords: 

लेख: 

फॅमिली क्रॉनिकल्स ५ : आमचे घर रिमॉडेलिंगचे प्रयोग!

आळशीपणात आमचा नंबर फार वरती लागतो. तहान लागल्याखेरीज विहीर खोदायची नाही हे तत्व! पूर्वी तर आमच्या राजा-राणीच्या संसारवेलीवर फुलं का काहीसं फुलायच्या आधी, शनिवार-रविवार सकाळी उठलो की आम्ही टि.व्ही. समोर सोफ्यावर तंगडया पसरून जे बसून रहायचो की बस्स! भूक लागली, काहीतरी नाश्ता बनवूया असा उच्चार दोघांपैकी जो पहिले करेल त्याने उठून मुकाट नाश्ता बनवायचा हा एक अलिखित नियम होता. त्यामुळे व्हायचं एवढंच की ११-११.३० वाजेपर्यंत दोघंही कुळकुळत पोटातले कावळे घेऊन बसून रहायचो पण उठून करावं लागेल या भीतीने ते ओठावर आणण होईल तेवढ टाळायचं!

Keywords: 

लेख: 

Subscribe to फॅमिली क्रॉनिकल्स
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle