निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!
रात्रभर मस्त पाऊस पडून गेला होता आणि अजून हि थोडी रिमझिम चालूच होती. हवेत मस्त गारवा आला होता. विचार केला आज थोडा निवांत चहाचा आस्वाद घ्यावा, थोडा पेपर वाचवा आणि मग ऑफिसला जायला निघावे, तसेही काही अतिमहत्वाचे काम वाट बघत नव्ह्ते. थोड्या वेळात ऑफिसला जायला बाहेर पडले, आणि लक्षात आले की आज पाऊस जरा जास्तच आहे. रस्त्यावर जागो जागी पाणी साचले होते. काही गाडीवाले जोरात गेल्याने अंगावर उडणाऱ्या पाण्यापासून पादचारी आपला बचाव करत होते. शाळेत जाणारी काही मुले बसची वाट बघताना पावसात भिजत होती आणि त्यांच्या आया (आई या शब्दाचे अनेक वाचन) त्यांना ओरडत होत्या.
एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वातच असं काहीतरी असतं की त्याची समोरच्यावर लगेच छाप पडते. कोणाची उंची छान असते, काही लोक दिसायलाच खूप छान असतात, कोणाचं हास्य अगदी मनमोहक असतं तर काहीजणांचा आवाजच चक्क मृदू असतो म्हणे! मृदू, म्हणजे नुसता गोड आवाज नाही… गोडही आणि शिवाय हळूवार आणि तलम असाही! म्हणजे अगदी विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (कोणतेही एफेम चॅनेल नाही हां, विविधभारतीच. बाकी एफएम चॅनलवरचे ते आरजे आणि मृदू आवाज यांचा काहीच संबंध नाही. तर ते असो.) असं म्हणतात, की असा गोड आवाज ऐकून समोरची व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असंही वाटायला लागतं म्हणे..
गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात.
जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
माबोवरचे माझे काही जुने ललित इकडे आणते आहे. हे त्यातले एक.
घरासमोरचा रस्ता ओलांडला की भलंमोठं पार्क आहे, त्युर्केनशान्झपार्क(Türkenschanzpark). ह्या पार्कमध्ये जायला जवळ जवळ १४-१५ प्रवेशद्वार आहेत. त्यातलं एक नेमकं आमच्याच घरासमोर. रस्ता ओलांडला की तुम्ही पार्कात. कदाचित म्हणुनच माझे पार्कमध्ये जाणे नियमित. ह्या पार्कमध्ये चालणे, पळणे नेहमीचेच. आलेल्या पाहुण्यांना शतपावली करायला घेऊन जायचे आमचे आवडीचे ठिकाण!
सध्या मला एक मोठाच प्रश्न सतावीत आहे मला. सर्वच बाबतीत असे नाही पण बऱ्याच बाबतीत मला कोणतीच बाजू ठामपणे घेता येत नाही. सगळ्यांचे सगळे बरोबरच वाटते आणि त्याचबरोबर चुकीचेही वाटते. आता सैफ-करीना ने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले त्यावरून एवढा गदारोळ माजला. सुरुवातीला मला पण थोडे विचित्र वाटले पण मग मी विचार केला की माझ्या मुलाचे नाव ठेवताना ना मी आई- वडिलांना विचारले ना सासूसासऱ्यांना मग सैफ-करीना ने काय म्हणून जनतेचा विचार घ्यावा (किंवा करावा)??? हेही पटले. पण तरीही तैमूर नाव ठेवायला नकोच होते हे ही पटले.
"सगळ्यांनी बारा वाजता रिवोल्युशन बारमधे जमा!" पावणेबाराला इमेल. आमची पिकोचिप कंपनी नुकतीच एका अमेरिकन कंपनीने विकत घेतली. दोन महिने भवति न भवति होऊन शेवटी डील झाले. दोन कंपन्यांचे मर्जर म्हणजे मोठ्या माशाने छोट्याला गिळणे. नोकर्या जाणार हे नक्कीच. म्हणून आम्ही सगळे छोटे मासेवाले मनातून घाबरलेले. त्यात पुन्हा राजकारण. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण बळीचा बकरा वगैरे. जिथे तिथे हीच चर्चा. इमेल आल्यावर धपाधप कोट, टोप्या चढवून, काय सांगणार असतील या विचारात, घोळक्याघोळक्याने रिवोल्युशनला पोचलो.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात, मला जर का लोकं लोह पुरुष म्हणत असतील तर एक पोलादी पुरुषही आहे आणि तो म्हणजे 'एकनाथजी'
विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या व त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यांच्या रक्तात, नसानसात विवेकानंद भिनलेले आहेत अश्या प्रामुख्याने व ठळक तीन व्यक्ती आहेत प्रथम क्रमांकावर भगिनी निवेदिता, सुभाषचंद्र बोस व तिसरी व्यक्ती माननीय एकनाथजी रानडे!