जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.