पिया तोरा कैसा SS अभिमान म्हणताना शुभाजी दुसऱ्या 'कैसा' ला अशी सुरेल , गंभीर तान घेतात की तो अभिमान आणि त्याचं वैयर्थ सुद्धा समान क्षणात शून्य होतात. खरंच एक चित्र स्वतःला सहस्र शब्दात व्यक्त करत असेल तर एक गाणं सहस्र भावनांना मुक्त करत असेल, वाट करून देत असेल असं म्हणायला हरकत नसावी. संगीत अशी निर्मिती आहे ती दुसऱ्या अशा निर्मितीला वाट करते , जिचे अस्तित्व आत आहे हे माहितीही नसतं. ओह असही वाटू शकते का मला , कुठले प्रतल आहे हे..... असं काहीसं.
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी..
बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी
आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष..
पण तू....
माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस
येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का
उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस
माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात
माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस
मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी
खूप काही सांगावं वाटतं
पण नाही सांगू शकत मी
मी न्याहाळत राहतो तुला
इतकी कशी तू वेडी...
गेली कित्येक वर्ष पाहतोय मी तुला
श्रीहरी स्तोत्रम् ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे.
************
तूच नारायणा ,कधी गळ्यात पुष्पहार घालून बसतोस आणि मी तुला हरी हरी म्हणून हाका मारते आणि तू 'ओ ' तर देत नाहीसच पण सर्पमाळ व रूद्राक्षाने सुशोभित होऊन येतोस. मगं मला वाटते की हा आशु-तोष तर नक्की ऐकेल.. मला कधी कळणार की तुम्ही एकच आहात.
हे असं चालणार नाही' आदित्य मनोमन ठरवत होता. उर्वी इथे अचानक येऊन थडकली हे त्याला अजिबात पटले नव्हते. ती दिसल्यावर तिला घरातच घ्यायचे नव्हते पण ती इतकी थकलेली, गारठलेली होती की शेवटी तिला उचलूनच न्यावे लागले. त्याच्यासमोर दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, घरात आली तर आली पण तो तिला कणभरही माहिती मिळू देणार नव्हता. ना तिच्याशी कामाशिवाय काही बोलणार होता. फक्त हो, नाही मध्ये उत्तरे द्यायची आणि वादळ जरा थांबले की लगेच तिला पिटाळून लावायचे हाच त्याचा प्लॅन होता.
निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
सूचना( ही पोस्ट स्वयंपाकासंबंधी आहे. विषय आवडत नसल्यास तुमचा कंटाळ्याचा अधिकार अवश्य वापरा)
समोर ठाकलेल्या विपरीत परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रत्येक व्यक्तीचे मार्ग वेगवेगळे असतात. सध्याच्या परिस्थितीत आजूबाजूला बघितलं तर लोक काय काय करत आहेत! इथे बेल्जियम मध्ये लोक गात आहेत, व्हायोलिन वाजवत आहेत, रोज ठराविक वेळी टाळ्या वाजवत आहेत आणि सगळ्यात जास्त लोक स्वयंपाक करत आहेत.
चैत्र लागलाय, पालव्या फुटल्या आहेत, कैऱ्या लगडल्या आहेत, कोकीळ रंगात येऊन गातोय, गुलाब फुलले आहेत, भवताल घमघमतोय,
पण हे सारं सहन होइना,
ती वाट पाहतीये...
फक्त एका पत्राची! पतीया न भेजे हो रामा..... कानात earplugs आहेत कलापिनी ताई चैती गतायेत. चैती- चैत्राचं गाणं.
घरातच अडकून पडायचा चैत्र यंदाचा. मैत्रीण अवघडलीये आठवा सरेल. तिला फोनवरच कविता ऐकवली मर्ढेकरांची:
बाळगुनी हा पोटी इवला गोळा, हसशी प्रसन्नतेने;
साकारुनी दे निराकृतीला विरूपता तव तन्मयतेने