ललित

वसंतानुभव - २

वसंतानुभव - १

मार्च मधले असे सूर्य, उन यांच्या सोबतचे काही दिवस गेले की आपण खुश होतो, पण अजून थंडीची एक शेवटची लाट येणे बाकी असतं. आपला उत्साह कधी कधी, खास करून सुरुवातीला पहिल्या दोन तीन वर्षात असा असतो, की मोठे जॅकेट्स, बूट सगळे नीट पॅक करून कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात टाकले जातात. सवयीने मग हे उन फसवं आहे, अजून एक किंवा दोन वेळा थंडी पाऊस, जोरदार वारा यांची भेट व्हायची आहे हे समजायला लागतं.

Keywords: 

लेख: 

पावसाळी भाजी ...अळू

पावसाळी भाजी ...अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

Keywords: 

लेख: 

'स' रे ... स्ट्रीट आर्टचा

‘स’ रे … स्ट्रीट आर्टचा

‘इन्स्टा’ आणि एकूणच सोशल मिडीयामुळे स्ट्रीट आर्ट ह्या कलाप्रकाराला चांगले दिवस आले आहेत. प्रवासवर्णन लिहीणारे ब्लॉगर, व्हलॉगर, किंवा ख्यातनाम मंडळी (उर्फ सेलेब्रिटी) हल्ली विविध स्ट्रीटआर्टची चित्रे पोस्ट करतांना दिसतात. आणि तरीही स्ट्रीट आर्ट तसे उपेक्षितच. विचार करा - शेजारची चार-पाच वर्षाची इशिता “मी मोठ्ठी झाले की स्ट्रीट आर्टिस्ट होणार” म्हणाली तर काकूना किती गोरंमोरं व्हायला होईल.

लेख: 

ImageUpload: 

ये मोह मोह के

ये मोह मोह के पत्ते ❤️❤️❤️

मोह- मधूका लॉंजिफोलिया-मधूक- महुआ
लोकेशन-अंबरनाथ-जिल्हा-ठाणे

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भटकंती -११ कच्छच रण

भटकेपणा पक्का मुरलेला आहे माझ्यात. अन वर्ष सहा महिन्यातल एखादं भटकण काही मनाला पुरेस वाटेना. आणि अचानक धनलाभ म्हणतात तसा अचानक सायकल लाभ झाला मला. एका मैत्रीणीची, तिला उंच वाटणारी सायकल उर्फ रेड रायडींग बडी उर्फ रामप्यारी माझ्या घरी आली. It is said Car is too fast and walking is too slow , so cycling is the best way to see the world! रामप्यारी बरोबर ते अगदी पटायला लागल! पुणं चाकाक्रांत करता करता सिमोल्लंघनाचे वेध लागले. २०२१ च्या दसर्‍याच्या दिवशी कारला सायकल लटकवून मी अन रामप्यारी नाशकात पोचलो.एका ग्रुप बरोबर नाशकाच्या आजूबाजुचे रस्ते फिरले, विनयार्ड्स पाहिली , वाईन टेस्टिंग केल.

लेख: 

वसंतोत्सव

वसंत रंगात न्हाला गं
वसंत अंगात आला गं
पळस पांगारा शितल अंगारा
लेवून केशरी झाला
- शांत शेळके

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वसंतानुभव - १

शुष्क, पर्णहीन आणि राखाडी, ब्राऊन रंगाची झाडं, ढगाळ हवामान, सूर्य उगवला तरी थंडीचंच साम्राज्य, हिमवर्षाव झाला तर नवलाईचे दोन दिवस असे हिवाळ्याचे महिने जातात आणि मार्च उजाडतो. नेहमी सारखी थंडी नव्हतीच असे आठवणींचे उमाळे असले तरी रोजच्या सूर्यदर्शनाने, निळ्या मोकळ्या आकाशाने आपोआप जास्त उत्साही वाटायला लागतं.

सृजनच्या शाळेत या दिवसात एक खूप छान गाणं म्हणतात. मागच्या वर्षी मला पहिल्यांदा हे गाणं समजलं, पण सगळे शब्द लक्षात आले नव्हते, आता यावर्षी सृजन सध्या अखंड हे गाणं छान चालीत म्हणत असतो आणि मी पण त्याच्या सोबत म्हणत असते. त्या ओळींचा अर्थ मराठीत साधारण असा होतो -

लेख: 

इ इरॉटिकाचा

तर मी सध्या करियर चेंजच्या विचारात आहे. मला काहीतरी वेगळे करायचे आहे, हटके करायचे आहे, कूल करायचे आहे, माझ्यातल्या अंगभूत कलागुणांना, कौशल्याला बाहेर आणायचे आहे, मला माझ्या टर्म्सवर कामाचे तास हवे आहेत, मला स्वतःसाठी काम करायचे आहे. पण काय बाई करू, काय करू बरे, कायच बाई करू बरे? अशी माझी भुणभुणभुण ऐकून माझ्यासाठी करियर ऑप्शन्स शोधण्याचे आव्हान माझ्या ३ जणांच्या मार्केट रिसर्च टीमने स्विकारले. ही टीम म्हणजे माझी मुलगी चिन्मयी, भाची सानिया आणि भाचा आकाश. मी परत पूर्ववत अमेरिकी भांडवलशाही बळकट करणारे काम करू नये असे आमच्या त्रिकूटाचे ठाम मत होते.

Keywords: 

लेख: 

अ................आणि अस्मि

Screenshot_20211008-130930_WhatsApp.jpg

अ..... आणि अस्मि

 अ  ----  हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो.

अस्मि ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो.

हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही.

लेख: 

चिमणे जग

डेकेअरविषयी चाललेली चर्चा वाचून हे ललित आठवले. खूप जुने आहे. १३ वर्षांपूर्वी लिहिलेले. पण मुलं अजूनही अशीच रडतात आणि अशीच रूळतात. Haahaa 2 Haahaa 2

लेख: 

पाने

Subscribe to ललित