हातचं राखून

हातचं राखून

हातचं राखून वागणं कधी जमलंच नाही.
समोरच्या माणसासारखं मनात एक बाहेर एक असं राहणं जमलं नाही.
वाटत गेलं आपण जसे आहोत तशीच इतरही असतील.
आपण जसे मनाच्या तळापर्यंत दिसतो तशी तीही दिसतील. पण वरचे काही पापुद्रे सोडता लोक स्वतःला उलगडू देत नाहीत हे कळलंच नाही.
सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं माहित असणं चुकीचं आहे हे खूप उशिरा कळायला लागलं.
बरं आपल्याबद्दल सारं काही माहित असलेल्यांबद्दल आपल्याला तसं काहीच माहित नाही हेही उमजायला लागलं.
खुली 'किताब ही शिवी आहे का काय? कि आजकाल माणसंच बंद कपाटं झालीयेत?
व्यक्त होणं ही माझी गरज होती का की कमजोरी होती?
आता कळतं की माणसे मोजूनमापून बोलतात. शब्दांवर पुढच्याचे आयुष्य तोलतात.
खरा माणूस कसा हे कोणालाच कोणाबद्दल कळत नाही.
Was I that Naive Or Just that Stupid ?

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle