लेख

जर्मनीतलं वास्तव्य - अनुभव, माणसं इत्यादी - भाजीवाला आणि जॅम

आमच्या घरामागच्याच रस्त्यावर एक भाजीचं दुकान आहे. आम्ही नेहमी जातो त्यामुळे तो मालक ओळखीचा झाला आहे. त्याच्याकडे उत्तम क्वालिटीची भाजी मिळते, शिवाय ड्राय फ्रुट्स, घरगुती काही पदार्थ, काही रेडिमेड सलाड हेही असतात. मूळचा तुर्कीये मधला पण इथेच वाढलेला, प्रचंड उत्साही चेहऱ्याच्या त्याच्याशी भाजी घेण्यापलीकडे पण गप्पा मारल्या जातात. पहाटे तीन पासून तो कामाला लागतो. आता नेहमीचे ग्राहक म्हणून असेल, शेजारी म्हणून असेल तो बरेचदा भाजी सोबत अजून काहीतरी असंच जास्तीचं देतो. त्यातून शनिवारी गेलो तर हमखास, कारण रविवारी दुकान बंद असतं.

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - सुट्ट्या

इथे आल्यापासून ते अगदी मागच्या चार वर्षांपर्यंत, मला इथल्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अग्रस्थानी होत्या इथे मिळणाऱ्या सुट्ट्या. अर्थात आपल्यासारख्याच बाकीच्याही लोकांना भरपूर सुट्ट्या असतात आणि त्यामुळे कामं अडू शकतात असंही बरेचदा झालं आणि तेव्हा वैताग सुद्धा झाला. मग पालक म्हणून सुट्ट्यांची उपलब्धता बघता आवडीचं पारडं अजून जड झालं आणि मग आता किंडर गार्टन, शाळा या सुट्ट्या बघितल्यानंतर, ते अनुभवत असताना ते पारडं पुन्हा कुठे बसवायचं असा प्रश्नही अधून मधून पडला. जर्मनीतल्या सुट्ट्या - फायदे आणि तोटे हा अगदी सपट परिवार महाचर्चेचा विषय होऊ शकतो असे अनेक अनुभव जमा होत गेले.

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - उन्हाळा

असा असून असून किती उन्हाळा असेल? आपल्या सारखा कडक उन्हाळा थोडीच असेल तिकडे, कारण मध्य युरोप म्हणजे मुख्य थंडी, हिवाळा, बर्फ हेच पहिले डोक्यात येतं. मध्यपुर्वेकडचे देश, आखाती देश इथल्या त्रासदायक उन्हाळ्याबद्दल आपण ऐकलेलं असतं, पण युरोपात येताना आवर्जून करायच्या खरेदीत नेहमीच हिवाळी कपडे, थर्मल्स हे आघाडीवर असतात. थोडे दिवस उन्हाळा असला तरी 'आपल्याला' एवढा काही वाटणार नाही, सवय असते तशी असं वाटू शकतं. भारतात चोवीस तास डोक्यावर फिरणारे पंखे इतके सवयीचे असतात, की त्यांना आपण गृहीत धरलेलं असतं. शिवाय कुलर, एसी सगळंच असतं आणि इथे त्यातलं काहीच नसतं.

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - वासंतिक मिरवणूक - झॉमरटाग्सउमत्सुग (Sommertagsumzug)

दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या रविवारी इथे घड्याळ बदलते ही आता दहा वर्षात सवयीची बाब झालेली आहे. घड्याळ एक तास पुढे केलं जातं, पहिले दोन तीन दिवस जरा भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा सेट होण्यात जातो, पण सगळं पुन्हा नेहमीसारखं चालू होतं. वसंत ऋतू सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. एकदाची थंडी कमी होइल, जास्त वेळ सूर्यदर्शन व्हायला लागेल आणि एकदाचे हिवाळी कपड्यांचे जोखड उतरेल या आशा पल्लवित होतात. खरंतर अजूनही थंडी आहेच, रात्री तापमान एक दोन पर्यंत जातं आहे, पण तरी हवेतला बदलही जाणवायला लागतो.

Keywords: 

लेख: 

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने

कालच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरंच काही वाचलं, त्यावरून आपसूकच माझी भाषेची जडणघडण कशी झाली ते आता काय वाटतं, मराठी भाषेवरचं प्रेम असं बरंच काही मनात आलं, म्हणून त्यात माझ्याही या लेखाची भर.

Keywords: 

लेख: 

देवनागरीच्या पाऊलखुणा (१)

'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--

Keywords: 

लेख: 

देवनागरीच्या पाऊलखुणा (२)

भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्‍या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

जर्मनीतलं वास्तव्य - जर्मन भाषेचा प्रवास - २

शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to लेख
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle