गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.
मी तीन छोट्या लेखात किंवा भागात हे विचार मांडणार आहे. काही विधानांसाठी माझ्याकडे लगेच तिला उपलब्ध नाहीये त्यामुळे याकडे लक्ष न देता त्यामागील विचाराकडे संदेशाकडे लक्ष द्यावे असे मी आत्ता पुरते म्हणेन. म्हणजे विदा उपलब्ध नाही असे नाही मात्र माझ्याकडे संदर्भ या क्षणी उपलब्ध नाही हे एवढेच कारण आहे. पुढेमागे मी लेखात त्यांची भर घालीन.
पहिल्या भागात दोन सर्वाधिक परिणाम करणारे प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्वरूप.
दुसऱ्या भागात शाश्वत विकासाचं प्रारूप कसं असावं (आपल्याला काय मुक्काम गाठायचा आहे)?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या काही चांगल्या बातम्या पाहिल्या तर त्यात पर्यावरणाविषयीच्या बातम्या दिसतात. या जागतिक साथीनंतर भविष्यातले जग बदलेल असे बऱ्याच जणांना वाटते, मात्र पर्यावरणाचा विचार करताना ते बदल कसे असले तर हे आलेले संकट आपल्याला योग्य मार्गावर नेणारे ठरेल याबद्दल मला काही विचार मांडायचे आहेत.
तिसऱ्या भागात आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील जेणेकरून आपण अधिक शाश्वत मार्गाने जीवन जगू शकू. यात मी Do’s and Don’ts ची यादी देण्याच्या ऐवजी काही प्रश्न सांगणार आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलेत की तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय कोणता ते लक्षात येईल. अर्थात आपल्याला हे लक्षात येईलच की सर्वोत्तम पर्याय वापरणे सर्व वेळेस शक्य नसते. अशावेळी कमीत कमी हानी घडवणारा पर्याय वापरता येईल. It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.