"मैत्रीण युनिव्हर्सिटी" मध्ये घेतला जाणारा हा पाचवा कोर्स! नवीन कोर्सची घोषणा करणं ही प्रत्येक वेळी अतिशय आनंदाची, समाधानाची आणि अभिमान वाटेल अशी गोष्ट. 'मैत्रीण" सदस्यांनाही या कोर्सेसमधून शिकण्यासोबतच आनंद आणि समाधान मिळत असेल अशी आशा.
"रंग खेळू चला" मध्ये रंग खेळायला मजा आली होती ना! आता परत एकदा रंगांशी खेळायची संधी मिळणार आहे. लहानपणी शाळेत वापरलेला तो आयताकृती चपटा बॉक्स, त्यातल्या गोल किंवा चौकोनी रंगांच्या वड्या आणि बाजूच्या उभट खोलगट भागात एक ब्रश.. आठवला का?
चला, मग आपण लहानपणी घेतलेला रंगात भिजण्याचा अनुभव आपल्याला पुन्हा घेता येणार आहे. "मैत्रीण युनिव्हर्सिटी"च्या आगामी कोर्समध्ये आपण जलरंगात चित्र काढायला शिकणार आहोत.
"मॅगी" एक हौशी कलाकार! तिची कितीतरी जलरंगातली चित्रं आपल्या मनाला रंगवून गेली! हीच मॅगी "मैत्रीण युनिव्हर्सिटी" मध्ये घेऊन येतेय - "रंग भिजलेले" अर्थात जलरंग कार्यशाळा! अगदी साहित्य जमवणं आणि सुरुवात करण्यापूर्वीची पूर्वतयारी यांच्या तपशीलांसह.
घेणार ना मग भाग?