हिरवा निसर्ग

प्रवासाची मजा खरी पावसात येते... मैत्रिणींनो पावसात तुम्ही आवर्जून कोकणात जा.. अगदी मुंबई पासून थोड्या अंतरावर निसर्ग आपली वाट पाहतोय... काही पासपोर्ट नको... किंवा विजा नको....थोडा वेळ काढा आणि निसर्गाचा आस्वाद घ्या.... मी अलीकडेच चिपळूणला जाऊन आली... आणि खरंच खूप छान वाटते.
खरंच एखाद्या कवीला कविता करायला प्रेरित करणारा, किंवा एखाद्या चित्रकाराला चित्र काढायला उस्फुर्त करणारा हिरवा अगदी हिरवा निसर्ग आहे हा !!!!

फक्त मजा करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका ….. कोणत्याही नवीन ठिकाणी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा चांगल्या ट्रॅव्हल सल्लागाराच्या मदतीशिवाय भेट देवू नका… कधी कधी ते धोकादायक ठरते … पावसात डॅम्प धबधबे इथे सुद्धा माहितीशिवाय जाऊ नका … आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीव सांभाळा…आणि निसर्गाचा आनंद लुटा!!!

कविता
"ह्यापी माय ट्रीप"

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle