सिलसिला मध्ये ये कहां आ गये हम गाणे ऐकल्या व बघितल्यापासूनच ट्यूलिप गार्डन्स बघायचं फार मनात होतं. अॅम्सरडॅमला जाताना मुद्दाम क्युकेन हॉफ गार्डन जे १६ मे परेन्त उघडे असते व नंतर बंद होते ते बघता अनुभवता यावे अशी तजवीज करून आगाउ तिकीट बुक करून गेलो. नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले रंगीबेरंगी फुलांचे गालिचे किती सुखद असणार आहेत त्याची चुणूक विमान उतरतानाच आली. हिरव्या लॉन वर मैलोन मैल पसरलेले हर एक रंगाचे ट्यूलिपचे चौकोन आयताकार गालिचे बघून फार मस्त वाट्ते. भारतातील घामट, रखरखीत, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मे महिन्यात गेलो होतो त्यामुळे तर फरक जास्तच जाणवला. ह्या वसंतोत्सवाने मन अतिशय प्रफुल्लित होत होते. उतरल्यावर पहिल्या दिवशी संध्या काळी अॅम. मध्ये असलेल्या २४ गुणिले ७ पार्टी वातावरणाचा मनसोक्त अनुभव घेतला. रात्री दहा वाजत आले तरीही मंद प्रकाश वातावरणावर जादूचे अस्तर पसरत होता. उत्तम कपडे ल्यालेली जोडपी, तरूण कुटुंबे, गोरी गोबरी प्रॅम मधील बाळे, सर्व वयाचे स्त्री पुरुष बघत बघत एका मेक्सिकन रेस्तरां मध्ये पायेया, ( प्रॉन व चिकन) व वाइन असे जेवण केले व रूम वर आलो. उद्या बघायच्या फुलांची स्वप्ने बघत झोपी गेलो.
सकाळी आमची बस टूर कंपनीच्या ऑफिसा पासून सुरू होणार होती. आम्ही लवकर पोहोचलो. व वेळ होता म्हणून शेजारच्या कँडी व बेन जेरी आइस्क्रीम शॉप मधून आइस्क्रीम घेतले. अटकर बांध्याची म्हातारी झेंडा घेउन निघाली तसे धावत पळत गर्दीच्या शेवटी जॉइन झालो. व बस चढताना उरलेले आइस्क्रीम कोन्स डस्ट्बिन समर्पयामि करून मार्गस्थ झालो.
ह्या बसेस मध्ये वाय फाय सुविधा आहे. खाणे खायला मनाई आहे. फ्रेंच डच व इंग्लिश भाषेतून माहिती दिली जाते. शेजारच्या दोन अमेरिकन मुलींनी खाणे आणले होते ते गपागप खाउन साफसफाई केली. हे मी डोळे तिरपे करून बघितले. आता आपण पहिले बल्ब फार्म ला जायचे आहे व मग क्युकेन हॉफला असे कळले.
शहर सोडून बस गावाकडे निघाली. स्वच्छ क्रिस्प हवा. झळाळता सूर्य प्रकाश, व गावाकडची घरे.. रस्ते.... मन एकदम प्रसन्नच होते. स्प्रिंग इस इन द एअर.. ती टुमदार छान सजवलेली घरे बघून लेकीने इथेच्च राहायला यायचे नक्की केले. छोटासा चौक पार करून बस गावाच्या पायवाटेला लागली व चहू बाजूंनी हर तर्हेचे ट्यूलिपचे पट्टे दिसू लागले. शुभ्र, पिवळा निळा, केशरी, लाल , जांभळा, भगवा गुलाबी, किती ते रंग.. मन वेडे झाले. बस एक वळण घेउन एका साध्या घरासमोर थांबली व आम्ही सर्व उतरलो. म्हातार्या डायवर बाबांनी आता आरामात सर्व बघून घ्या मग पुढे आहेच पायपीट असे सांगून सिगरेट
शिलगवली.
मग समोर आला कंफर्टेबल बर्म्युडा व टीशर्ट घातलेला डॅन. हा तो शेतकरी!!!
हा तर इतर टूरिस्टांसारखाच दिसत होता. गोरा गोरा पान सहाफूट उंच. व निळे डोळे. चला शेत पाहायला म्हणून घेउन गेला. घराच्या मागेच शेत. पण लाल भड्क सिंदूरी रंगाच्या फुलांचे... मन एकदम शांत शांत झालं. त्याने शेतीची थोडी बहु त माहिती दिली व फोटो काढायला सोडले. फार आत जाउ नका व फुले झाडे खराब करू नका अशी तंबी देखील दिली.
तिथे सेल्फी, व इतर फोटो काढायला उपयुक्त असे बरे च सेटिंग होते. लाकडी बूट, सोफे, छोटी बाग.
व आतल्या बाजूला एक मस्त सजवलेले कॅफे होते. आत माहिती, फोटो, छोटे बूट लटकावलेले शोभेचे सामान, सुवीनीर स्टँडहोते.सौ व एक क्यूट मुलगी कॉफी पानाचे बघत होत्या. मंडळींनी फोटो वगिअरे काढण्यात अर्धा तास घालवला.
मग शेतातल्या त्या बार्न मध्येच एका जागी अंधार करून ट्युलिप बल्बची माहिती देणारी फिल्म दाखवली. त्या देशा साठी व ट्रेड् साठी बल्बच महत्वा चे आहेत. फुले म्हणजे केवळ क्यूट साइड इफेक्ट.!! हे त्या फिल्म मध्ये सांगितले आहे. फुलांचा सीझन संपला की ती कापून जमिनीतच गाडतात व बल्ब ची हार्वेस्ट करतात. हे बल्ब एक्स्पोर्ट केले जातात.
इथे तुम्हाला बल्ब मिळतील ते घेउ नका ते जुने असतात व फुले फुटणार नाहीत. ऑनलाइन ऑर्डर करा असे त्याने स्पश्ट सांगितले. परखड माणूस. गंमत म्हण जे इथे एकच टॉयलेट आहे तर तुम्ही शक्यतो गार्डन मध्येच जा असेही तो म्हणाला.
इथे दीड तास घालवून आम्ही क्युकेनहॉफ गार्डन कडे मार्गस्थ झालो..
गार्डन फार मोठे व टू मच आहे. ते बघून आल्यावर माझ्या मनात जास्त आवडून गेला तो हा फार्म, ते राजस शेतकरी जोडपे व ते सिंदूरी गालिचे. ते खास माझ्यासाठी आहे असे वाट्ले. तिथल्या शांततेत लेकीला मेथॉडिकली फोटो घेताना पाहिले व वाट्ले सच में ये कहांतक आगये हम. .....