सॅन्ता मोनिका, पॅसिफिक कोस्ट हायवे व मालिबू..

काल बर्‍याच दिवसांनी लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो. नाही नाही चुकलेच. कामासाठी बाहेर पडलो, काम झाल्यावर लाँग ड्राईव्हचा बेत ठरला. नाहीतर गेले काही दिवस घरातून बाहेर पडणे फक्त कामासाठीच होत होते. (आजारपणे, विचित्र हवा, थंडी इत्यादींमुळे..)

आमच्या मेंदूमध्ये लाँग ड्राईव्ह आणि पॅसिफिक कोस्ट हायवे (किंवा पीसीएच किंवा हायवे१) ह्यांचे कनेक्शन आहे कोणास ठाऊक! आम्ही दर काही दिवसांनी तिकडे वळतोच वळतो. पीसीएच / हायवे १ हा लॉस एंजिलीसपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत तब्बल 655 माईल्स म्हणजे 1054 किमी इतका दूरपर्यंत पसरलेला आहे. ह्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १-१किंवा फारतर २-२ लेनचा रस्ता, (नॉर्थला जात असाल तर) त्याच्या उजव्या हाताला अखंड डोंगर व डाव्या बाजूला अखंड पॅसिफिक ओशन.. Love

मी २००७ साली लग्न करून लॉस एंजिलीसपासून ४० माईल्सवर असलेल्या कॅमरिओ ह्या उपनगरात आले. पहिल्याच विकेंडला नवरा त्याच्या आवडत्या बीचवर घेऊन गेला आणि मी त्या समुद्राच्या, रस्त्याच्या, डोंगराच्या पार प्रेमातच पडले.

sunclouds2

sunclouds1

२००७ साली हा खाली दाखवलेला समुद्र, बीच फक्त आमचा होता! खरंच. कोणीसुद्धा यायचे नाही तिथे. फारफारतर एखादी कुटुंबवत्सल फॅमिली, एखादा चित्रकार, फोटोग्राफर अन भरपूर सीगल्स. आता तिथे खूप वर्दळ वाढली आहे. Sad तेव्हा म्हणजे आमची हक्काची जागा होती ती. त्या सौंदर्यावर फक्त आमचा हक्क होता. :)

IMG_1122

IMG_1125

IMG_1120

IMG_1182

IMG_1136

हे झाले २००८चे फोटो. :)

काल कामं झाल्यावर बाहेर पडलो. लॉस एंजिलीस वरून मालिबूसाईडला जाताना वाटेत सॅन्ता मोनिका लागते. तिथले हे फोटो..

malibu pch

malibu pch

malibu pch

आकाशात अगदी ढगांची दाटीवाटी होती. पण ढग जरी जमा झाले तरी पाऊस पडणे म्हणजे सदर्न कॅलिफॉर्नियासाठी अगदी लगानमधील घनन घनन मोमेंट असते. नुसतेच ढग येतात व जातात. पाऊस अगदी पडत नाही. गेल्या ५-६ वर्षात तर दुष्काळ अगदीच पराकोटीला गेला होता. गेल्या वर्षी ४ दिवस अगदी मुसळधार पाऊस पडला होता. बहुतेक सगळीकडचीच हव बदलत आहे. पुण्यातही परवा पाऊस झाला.. पण आमच्या भागात पावसाची गरज आहे.. असो.. तर ढग चिक्कार जमा झाले होते. पण ते तेव्हढंच. जरा वेळाने ऊनही पडले लख्ख! पॅसिफिकचे पाणी नुसते चमचम करत होते! :)

malibu pch

malibu pch

एका व्हिस्टा पॉईंटला थांबून मग भरपूर फोटोग्राफी केली..

malibu pch

malibu pch

malibu pch

malibu pch

हे घ्या व्हिडिओज! पहिल्या व्हिडिओतल्या दोन गंमती दिसल्या का?

पक्षी मैत्रिणींची सभा भरली होती बहुतेक! :)
malibu pch

परत निघालो अन हा बाबाजी दिसला! काय ती बाईक! लॉस एंजिलीसमध्ये असल्या नमुन्यांना सुमार नाहीये. इतक्या वेगळ्या बाईक्स, गाड्या अन लोकं दिसतात! :)

malibu pch

अचानक! म्हणजे किती अचानक.. आकाश सगळे ढगांनी कव्हर झाले.. मगाचच्या कडकडीत ऊन्हाचा लवलेशही दिसेना..

malibu pch

malibu pch

अन् पाऊस सुरू झाला! :) मला कितीही फोटोग्राफीसाठी म्हणून कडकडीत ऊन आवडत असले, तरी पाऊस पाहून माझं मन कायम नाचायला लागते! अगदी पाऊसवेडी आहे मी! इतकी खूष झाले मी..
malibu pch

नेमकं तेव्हाच माझे अत्यंत आवडते गाणे लागले.. अन् तो सगळा परीसर, ते वातावरण, तो पाऊस, ते गाणं मला अगदी लक्कीली व्हिडिओत घेता आले..

मी कालचा दिवस कधीच विसरणार नाही! मी फेसबुकवर म्हटले तसे , if I don't get this malibu-PCH drive-pacific ocean fix every now and then, I would be very unhappy person!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle