मला पार्टी डेकोरेशन्स थीम्स प्रमाणे करायला खूप आवडतं. :) मुलांचे वाढदिवस आणि गणपतीत मी माझी ही हौस भागवून घेत असते.
मी अत्तापर्यंत केलेल्या थीम्सः निमो, थॉमस द ट्रेन इंजिन, कार्स, बॉब द बिल्डर, शेफ पार्टी, माईन क्राफ्ट आणि शेप्स अॅन्ड कलर्स, लेगो. गणपतीत यावेळी आम्ही समुद्रातला गणपती केला होता. शक्यतो रीसायकल मटेरियल वापरून मी डेकोरेशन करते.
या सगळ्यातली माझी फेवरेट थीम माईनक्राफ्ट. आणि मग लेगो. लेगोवर नंतर लिहीन. :bigsmile:
मुलाच्या ९व्या वादीला आमची थीम होती माईनक्राफ्ट.
हल्ली आमच्या पार्ट्या बॉईस ओन्ली असतात त्यामुळे त्यांना बिझी ठेवण्यासाठी मी ट्रेझर हंट ठेवला होता.
वादी डिसेंबरात असल्याने ट्रेझर हंट घरातच करावा लागणार होता, कारण इथे ४ शीच अंधार पडतो. त्यामुळे मुलं बाहेर जाऊ शकत नवती. म्हणून मग रिडल्स बेस्ड ट्रेझर हंटनेट ठेवायचं ठरवलं. बराच विचार करून क्लूस कुठे कुठे ठेवायचे ते ठरवलं. मग नेट वर बरीच शोधाशोध करून मी काही रिडल्स निवडली. काही स्वता तयार केली. ही सगळी रिडल्स मी एका पिवळसर कागदावर प्रिंट करून मग चुरगळून लपवली होती.
ही माझी रिडल्स
सगळ्यात पहिला क्लू मी दिला. तो असा होता.
What has numbers on the outside and letters on the inside?
Answer: Letter Box याला मुलांना बराच वेळ लागला आणि जेंव्हा उत्तर सापडलं तेंव्हा मुलं जाम हसली :)
दुसरा क्लू त्यांना लेटर बॉक्स मधे मिळाला. तो पुढील प्रमाणे
I have bark but I do not bite!
घरात एक नकली झाड आहे त्यात एका फांदीवर त्यांना पुढचा क्लू मिळाला.
After fighting crime all day, there is one way to WASH the dirt away.
bath tub मधे होता पुढचा क्लू: i carey books. अर्थात बुक केस. हे त्यांना लगेच सापडले. :)
The driest place in the house will guide your search. होता पुढचा क्लू. ड्रायर मधे बरीच शोधाशोध केल्यावर ड्रायर च्या मागे टेप केलेला पुढचा क्लू त्यांना सापडला.
Asters are orange. Sunflowers are yellow. Where i 've hidden the clue u 'll never know. हे रिडल मी केलय :) घरात एक Asters आणि Sunflowers असलेला vase आहे. त्यात होता पुढचा क्लू.
A clue to find where you keep things cold Where to go next is what you'll be told.
फ्रिज वर एका मॅग्नेट मधे मी पुढचा क्लू अडकवून ठेवला होता. तोही ते बराच वेळ शोधत होते :)
मग It's filled with letters, squares and numbers, too. What day is it? This will give you a clue
हे त्यांनी कॅलेंडर आहे हे शोधलं पण घरात ३/४ कॅलेंडर आहेत म्हणून पळापळ झाली. शेवटी एकात सापडला पुढचा क्लू.
I have a face, two arms, and two hands, yet I can not move. I count to twelve, yet I can not speak. I can still tell you something everyday.
मुलं हुशार आहेत. हे लगेच सापडलं. :)
if you are able add t. हे पण सोप्पं होतं.
I have memories, but none of my own,
whatever's on my inside is what is shown.
picture frame :) हे पण जरा वेळाने सापडलं.
I fill the room with pretty colors
U will find me somewhere in the middle. हा मी केलेला क्लू पण नीट जमला नाही त्यांना सापडला नाही. मग मी हिंट दिली.
उत्तर आहे fruit bowl त्यात मिळाला पुढचा क्लू: What starts with 't' ends with 't' and has 't' in it?
लेकीच्या toy teapot मधे होता पुढचा क्लू: I have keys but no locks and feet but no socks, what am I?
हा पण लेकीचा छोटा पिआनो आहे त्यामुळे ते बराच वेळ इकडे तिकडे फिरत होते पण शेवटी ट्यूब पेटली लेकाची :)
त्यात एक scrambled word होता जो unscramble केल्यावर (storage bench) शेवटी एकदाचं ट्रेझर मिळालं. :bigsmile:
मुलांनी खूप एंजॉय केलं. नुसती धमाल. काही क्लू त्यांना लगेच आले, काहींना जरा विचार करावा लागला. काही आम्ही थोडी मदत केली. पण मुलं नुसती एका खोलीतून दुसर्या खोलीत पळत होती, डोकी खाजवत होती, धमाल नुसती.
मग आम्ही डिनर ब्रेक घेतला. मुलांचा पिझ्झा खाऊन झाल्यावर आम्ही pin the tail on donkey खेळलो. फक्त यात मुलांच्या डोळ्यावर पट्टी न बांधता मी पेपर बॅग वापरून स्टीव चं डोकं बनवलं होतं. मुलं ते बघून जाम खुश झाली.
मग रिटर्न गिफ्ट दिल्या आणि मुलं घरी गेली. सगळ्या मुलांनी लेकाला सांगितलय की तुझ्या पुढच्या वादि ला पण ट्रेझर हंट ठेवायला सांग तुझ्या आईला. :bigsmile:
बाकी डेकोरेशन मी फार केलं नवतं, घरात हिरवे फुगे टांगले होते, त्यांवर क्रीपर फेस चिकटवला होता. दरवाज्यावर हिरव्या पेपर नॅपकिन वर क्रीपर फेस लावला होता आणि बॅनर माईनक्राफ्ट फाँट वापरून बनवलं होतं, तो मला नेट वर मिळाला होता.
गुडी बॅग्ज हिरव्या पेपर बॅग्ज वापरल्या होत्या आणि त्यावर पण क्रीपर फेस चिकटवला होता. मुलांना story book दिलं रिटर्न गिफ्ट म्हणून white paper मधे wrap करून.
स्नॅक्स मी माईनक्राफ्ट मधे जे जे फूड आहे तेच ठेवले होते. आणि फूड लेबल्स जशी माईनक्राफ्ट मधे आहेत, म्हणजे जे सिंबॉल आहेत ते प्रिंट केले होते.
मला केक घरी करता येत नाही म्हणून मी सेफवे मधून प्लेन हिरवा केक आणला आणि चॉकलेट वापरून त्यावर क्रीपर फेस बनवला.
लेगो चे स्टीव, क्रीपर आणि एंडरमन बनवले लेकाने ते टेबल वर सेंटर पीस म्हणून ठेवले.
स्नॅक टेबल वर हिरवा टेबल क्लॉथ घालून त्यावर काळ्या प्लेटस मधे स्नॅकस ठेवले.
फोटो आहेत कसे टाकयचे ते शोधते मग टाकते.
लेक इतका खुश झाला की दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर दहाव्या वादी ची थीम मला सांगण्यात आली इंडियाना जोन्स :O
मला जाम मजा आली ही पार्टी प्लॅन करताना. एकदम कमी बजेट मधे मस्त पार्टी झाली.