मुलींनो, मी सप्टेंबरात मित्रमैतरणींबरोबर स्पेनला चाललेय. फिरायला. कुठं विचारावं ते कळलं नाही म्हणून.इथं विचारतेय. काही सल्ले , सूचना , मस्ट सी मस्ट डू असल्यास कळवा. 5 गावं बघून होतील.
खरं तर हे काम खूप दिवस ( दोन वर्शं) पेंडिंग होतं. आता येऊन शूंपीचा निरोपवहीतला मेसेज पाहीला. खूप उशिरा. तरी आता इथं माहिती लिहायला लागते. जमेल तशी.
आम्ही मद्रिद, बार्सेलोना, मलगा, रोंडा आणि सेविले ( सेविया) ही गावं केली. यात बार्सेलोनाला मी एकटी गेले होते. पूर्ण ३ दिवस. मी हॉप इन हॉप ऑफ बस पास घेतलेला. पब्लिक ट्रन्स्पोर्ट चांगला आणि सेफ नाही असं कळल्यामुळं आणि मी अज्जिबात धाडसी नसल्यामुळं ते प्रयोग केले नाहीत. बसेस खूप कन्वेनियंट आहेत आणि सगळं कवर करतात. लिहीत रहाते इथेच .