डोहाळेजवणात मिळालेला सुंदर ब्रोकेड चा ब्लाऊज पीस होता.ब्लाऊज शिवायचे नव्हते.
गोल्डन श्रग शिवायला टाकायला गेले तर टेलर ने ९०० शिलाई सांगितली. त्याला मनात 'गेलास ढगात' म्हटले आणि २५ रु. चे अस्तर आणून घरी शिवायला घेतला.माझे आणि शिवणाचे विशेष सख्य नाही उसवलेले शिवण्याशिवाय.आणि फॅशन मेकर मशिन साबांचे असल्याने जपून वापरावे लागते तटकन सुई किंवा बॉबिन चा दोरा तुटला तर मला दोन्ही बदलता येत नाही. :)
या सगळ्यातून मनाच्या डोळ्याने बघत आणि कोणतीही मापे न घेता शरीराला गुंडाळून अंदाज घेत शिवलेला श्रग.
यात बरेच मिस हॅप झाले.कधी तीन बाजूने सोनेरी चौथ्या बाजूने अस्तराची बाजू वर, कधी सर्व बाजू नीट शिवून झाल्यास जॅकेट सोनेरी बाजू वर येईल असे उलटे करायला जागाच ठेवली नाही असा शोध लागणे.
पंधरा ऑगस्ट ला नेट लावून पूर्ण केले.नवरा म्हणाला चांगले झाले.त्याला विचारले ऑफिसात घालू का एकदा व्हाईट कुर्ता गोल्डन लेगिंग बरोबर..तर म्हणाला इतका चांगला नाही झालेला.जवळ पास जिथे २-३ तास दिसणार असशील तिथे घालायला ओके आहे. :ड :ड
अस्तर सध्या जरा जास्त बाहेर दिसतेय पण धुतल्यावर श्रिंक होऊन मापात येईल या आशा आणि अपेक्षा.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle