https://www.maitrin.com/node/1277 भाग2
न्या 'कर्ती' झाल्या पासून मला दिवाळीत अत्यंत महत्वाच डिपार्टमेंट मिळालं आहे .... रांगोळी काढून झाली , कंदील करून झाला की पसारा आवरणे, मधेमधे लुडबूड करून फोटो काढणे ...रंगोळीवर सक्त पहारा ठेवणे, यात मुख्य काम रांगोळीला न्या कडून वाचवणे ...बाकी चिल्ली पिल्ली इतकी खतरनाक न्हायती :ड ...रांगोळी च्या रंगात रंगलेल्या न्या ला 'धुवून' ( i wish तुमच्या मनात जो अर्थ आलाय तो असता :winking: )ओळखण्या लायक बनवणे
माझ्या कामाचा पाढा वाचावा तेवढा कमीच :uhoh: सो आपण मुख्य विषयाकडे वळूया...
ह्या आम्ही रंगवलेल्या पणत्या
हा न्या चा कंदील, हा आज्जीच्या घरी लागलाय... आमच्या घरचा वेगळा आहे पण त्याला बाबा चा हात लागल्याने तो इथे टाकणं, न्या तत्वात बसत न्हाय
ही आमची पहिली रांगोळी , हात साफ केलाय ते दिसतंय म्हणा
हा आमचा नवीन नाद मग त्याला रांगोळीत सुद्धा उतरवणारच
हा कालचा मास्टरपीस ...असं लोक म्हणतात हो ..आम्ही तर ह्यावरून, दोनदा आजी सोबत कबडी,पकडापकडी खेळून झालोय आता माझ्या वरच्या ("न्या पासून वाचवणे" ) वाक्याचा अर्थ लागला असेलच