२८ November!

आजची गोष्ट दोन मुलींची आणि दोन आयांची!
फार वर्षांपुर्विची गोष्ट आहे... तरी साधारण ३३ वर्षांपुर्विची! लग्नाच्या तब्बल ३ वर्षान्नी आईला दिवस राहिले होते! हो त्या काळी ३ वर्ष मूल-बाळ नसण खरच खूप काळजिची बाब होती.
यथासांग दिवस भरत आले तशी delivery साठी आईची माहेरी (अकोले ,अहमद नगरला) पाठवणी झाली. मोठया हौसेने सगळे काळजी घेत होते. कळा सुरू झाल्या तसे सगळे दवाखान्यात पोहोचले. Normal delivery होत असता बाळाच डोकं काही केल्या बाहेर येईना! सगळे गांगरुन गेले! डॉक्टरांनी हात टेकले गावातले बाकी कोणी डॉक्टर हात लावायला तयार होईना. जो तो संगमनेरला हलवायचा सल्ला देत होता!आज्जी ,अजोबा ,मामा सगळे धास्तावले होते!
अशा अवस्थेत त्या काळी ३० किलोमीटर अंतर प्रवास करणं! मनाचा हिय्या करुन मामाने जीप ठरवली! सगळे कसे तरी संगमनेरला पोहोचले! आईने धीराने घेतलं! वाट्टेल तसे cuts घेउन forcep delivery झाली! आणि २८ नोव्हेम्बर १९८३ साली माझा जन्म झाला! आज्जी अजुनही ऐकवते मला माझी लेक धीराची म्हणून दोघिही आज धडधाकट आहात!

मग बराच काळ लोटला माझ लग्न झालं. मोठी मुलगी अनुष्का झाली. आम्ही दुसऱ्या बाळा साठी प्रयत्न करत होतो. यथासांग माझी पाळी चूकली. UPT kit आणुन आम्ही खात्री केली मला दिवस राहिले होते! Doctor कडे गेलो फ़ॉलिक acid च्या गोळ्या वगेरे सोपस्कार सुरू झाले. आठवडा झाला असेल नसेल तो मला भयंकर ताप चढला! डॉक्टरांच म्हणन पडलं की इतक्या early stage मध्ये viral fever अजीबातच चांगला नाही! Abortion चा सल्ला मिळाला...मन ,डोक सगळं सुन्न झालं! Second openion म्हणून अजून एका gynaecologist कडे गेलो तीने अगदीच वेड्यात काढलं आम्हाला. अबॉर्शन टळलं! काही दिवस मजेत आनंदात गेले आणि मला पित्ताच्या खडयांचा त्रास झाला त्या मुळे मागोमाग कावीळ! याही परिस्थितीत डॉक्टर खूप सकारात्मक होती! Laparoscopic surgery करुन पित्ताषय काढायच ठरलं! मला मनातून भयंकर धास्ती इतकुश्या पिल्लाचे किती हाल!
पण हेही सगळं निभावल! Sonography रिपोर्ट्स अगदी उत्तम आले! Planned c-section बाळंतपणाची तारीख ठरली ९ डिसेम्बर. २७ तारखेला आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो आणि अचानक माझी कंबर दुखू लागली. हॉस्पिटल मध्ये अड्मिट झाले... २८ November २०१३ !अवनी सगळ्या संकटांवर मात करुन माझ्या हातात सुखरुप विसावली!
अशी ही २८ November तारीख !
एका आईच्या धीरा मुळे एका लेकीचा जन्म झाला आणि एका लेकीच्या धीरा मुळे एका आईच्या विश्वासाचा पुन:र्जन्म झाला!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle