मागच्या वर्षीची माईन क्राफ्ट ट्रेझर हंट पार्टी मुलाच्या मित्रांमधे चांगलीच हिट झाली आणि तो पार्टी फीवर उतरत नाही तोवर मुलाची पुढची डिमांड आली, मला पुढच्या वर्षी ईंडिआना जोन्स पार्टी हवी आहे आणि पुन्हा ट्रेझर हंट हवे आहे.
मुलाची डिमांड ऐकून आधी झाले पण कुतुहल म्हणून गूगल केले तर खूप आयडिया मिळाल्या, आणि मग मी तो चॅलेंज स्विकारला :talya: . बजेट मधे ईंडिआना जोन्स थीम पार्टी करण्याचा.
या वेळी इन्वीटेशन ईमेल न करता हँड डिलीवर केले
मुलाला पाचच मित्र बोलवायची कंडिशन घातली, जी मान्य व्ह्यायला बरेच बार्गेनींग करावे लागले पण शेवटी तो तयार झाला.
बरेच सर्च करून पार्टी अॅक्टिविटीज ठरवल्या. आमची पार्टी भर डिसेंबर मधे असते त्यामुळे इन्डोर असते, अजिबात बाहेर बॅकयार्ड मधे वगेरे जाता येत नाही.
एकूण आठ अॅक्टिविटीज ठरवल्या. त्या अशा
१. आल्या आल्या मुलांनी आपापल्या गुडी बॅग्स शोधल्या. बॅग्स वर Egyptian Hieroglyphs वापरून एकेकाची नावे लावली होती. आणि मुलांना Egyptian Hieroglyphs चा चार्ट दिला. जो मी प्रिंट केला होता. या गुडी बॅग मधे अॅक्टिविटी लिस्ट होती.
२. सगळी मुलं येईपर्यंत मुलांना कलरींग अॅक्टिविटी दिली होती. वुडन स्नेक्स रंगवायला दिले होते.
३. मी एक कापडाचा व्हिप बनवला होता, जो रेग्युलर व्हिप पेक्षा सेफ होता, तो वापरून प्लास्टिक ग्लासेस चा टॉवर पाडणे
४. स्पायडर वेब टॉस, यात पेंटर्स टेप वापरून दरवाज्यात स्पायडर वेब केले होते, लांब उभे राहून मुलांनी या जाळ्यातून आरपार कागदाचे बोळे टाकायचे, बोळे जाळ्यात चिकटून बसता कामा नयेत.
५. ब्लाईंडफोल्ड गेम, यात जगाच्या नकाशावर विमान चिकटवायचे आम्ही सांगू त्या खंडात.
६. ब्लोडार्ट स्ट्रॉ आणि इयर बड्स वापरून
ही वेळेअभावी केली नाही
७. रिप्लेस गोल्डन स्टॅच्यू विथ रॉक. यात ती पेपर प्लेट न पाडता स्टॅच्यू च्या जागी एक दगड ठेवायचा होता.
८. एका मोठ्या कार्डबोर्ड बॉक्स मधे मी बराच कागदांचा कचरा भरला, त्यात ६ फार्मसीच्या डब्या होत्या, ४ डब्यांमधे चॉकलेट्स होती आणि २ डब्यांमधे ट्रेझर हंट चे क्लू होते. या बॉक्स ला मी मुलांचा जेमतेम हात जाईल असे भोक पाडले आणि मुलांना आत हात घालून डब्या शोधायला लावल्या. हे क्लू मिरर इमेज होते. ते मुलांनी आरशासमोर धरून वाचले की ट्रेझर हंट सुरू
९. ट्रेझर हंट यात २ टीम केल्या.
मागच्या वेळचे ट्रेझर हंट रिडल्स बेस्ड होते, यावेळी जरा जास्त चॅलेंजिंग प्रकार वापरले.
काही आयडिया मला इथल्या मामीने दिल्या होत्या.
ट्रेझर हंट मधे डीकोडर वापरून मेसेज डीकोड करणे, रीबस पझल, मिरर इमेज असलेलं रिडल, वर्ड पझल, क्रॉस वर्ड पझल, मिसिंग वर्ड पझल, स्क्रँबल्ड वर्ड पझल, ग्रिड पझल असे बरेच प्रकार मी वापरले. हे सगळे क्लू मी लहान लहान एन्वलप मधे ठेऊन जागोजागी लपवले होते.
फायनल क्लू दोन्ही टीमसचा सेम होता, आणि ट्रेझर चेस्ट लाँड्री बास्केट मधे लपवली होती :devil: जी तिथे असेल असे मुलाला अजिबात वाटले नसल्याने त्याने तिथे बघितले नाही म्हणे
मागच्या वर्षीच्या सेम लोकेशन्स क्लू ठेवायला वापरायच्या नव्हत्या म्हणून मला बरेच डोके खाजवायला लागले, तरी काही जागा मी पुन्हा वापरल्याच, त्या मुलांना लवकर सापडल्या. मुलं हुशार आहेत.
मुलांनी खूप धमाल केली. या वेळचे ट्रेझर हंट एकदम हिट झाले.
ट्रेझर चेस्ट मधे क्लिपऑन कंपस, मॅग्निफाईंग ग्लस्सेस, स्पायडर लॉलिपॉप्स, गोल्ड कॉईन चॉकलेट्स,
गोल्ड नगेट्स, प्लस्टिक स्पायडर्स, आणि स्नेक्स, फोम बॉल होता, व्हिप्स असा खजिना होता.
मुख्य जेवण पिझ्झा ऑन डिमांड आणि स्नॅक्स बटरफ्लाय विंग्स (चिप्स), फॉसिल कुकीस, मिनी पिरॅमिड्स (मिनि समोसे), डर्ट कप्स, संकरा सॅलड,आणि फ्रूट्स ऑफ अटलांटिस होते
ईंडिआना जोन्स चा फेमस बोल्डर सीन वरून मी केक केला होता जो मुलाला खूप आवडला.
थोडे माहोल किएशन
बॅनर
टीकी टॉर्च
दारातून आत शिरल्या शिरल्या
या पार्टीला वर्ष होऊन गेलेय तरी अजून त्याचे मित्र आठवण काढतात.
या वर्षीची थीम कार्निवल होती तिच्याबद्दल नंतर कधी तरी
हे सगळे इंडीज
(यातल्या बर्याच आयडिया मला नेट वरून मिळाल्या आहेत.)