नमस्कार मैत्रिणींनो,
बरेच दिवस येणार येणार जे ऐकत आहात त्या 'नी' ब्रॅण्डची एक सुरूवातीची झलक फक्त मैत्रिण वरच्या मैत्रिणींसाठी आणते आहे.
मी डिझाइन केलेली विविध धातूंच्या तारा वापरून बनवलेली काही कानातली लवकरच आणणार आहे.
सध्या केवळ कानातल्यांचेच कलेक्शन असेल.
तांबे, पितळ आणि जर्मन सिल्व्हर या तीन धातूंच्या तारांमधून ही कानातली बनवलेली असतील.
प्रत्येक कानातल्यामधे केवळ एकच वा दोन धातूंचा वापर असेल.
कॉर्पोरेट आणि कॅज्युअल अश्या दोन स्टाइल्स असतील.
सर्व डिझाइन्स १०-१५ एप्रिल दरम्यान फक्त मैत्रिणच्या सदस्यांसाठीच ओपन होतील. ५-६ दिवस मैत्रिणीपुरतीच ओपन असतील.
त्या काळात मैत्रिणींनाच केवळ बुकींग करायला प्राधान्य असेल.
आणि मग ती फेसबुक पेजवर पब्लिश होतील.
डिटेल्स धाग्यात मिळतीलच. इंटरेस्ट असल्यास धाग्यामधे लिहा.
हा धागा काढायची परवानगी दिल्याबद्दल अॅडमिनबाय आणि मैत्रिण टीमचे मनापासून आभार.