कोणाला ढोकळा कसा जमतो त्यानुसार एक एक शब्द निवडा टायटलमधून. :)
पाककृती १ : माधुरी
१.५ कप चना डाळ, १ कप उडद डाळ, १ कप मुगडाळ, १ कप तांदूळ धुवून, ५-६ तास किंवा रात्रभर भिजवून, वाटून आणि मग फर्मंट करून छान हलके जाळीदार
ढोकळे होतात. करतांना त्या बॅटर मध्ये मी हि मी, आलं लसूण पेस्ट पण घालते आणि वरून जिरं-मोहरी-हि मी-कडिपत्ता-तीळ ची फोडणी.
छान फर्मंट झालं की दही किंवा इनो घालायची गरज नाही. पण थंडी मध्ये जर नीट फुलून नाही आलं तरच मी थोडं इनो घालते.
पाककृती २ : मंजुडी
रवा-बेसन प्रत्येकी एक वाटी घेतलं आणि त्यात आंबट ताक दीड वाटी घातलंसगाअलं मिरची हळद हिंग साखर मीठ घालून ढवळून इनोचा अख्खा सॅशे घालून वाफवून घेतलं. वरून साखर पाणी मिश्रीत फोडणी घातली.
पाककृती ३ : संपदा
२०० ग्रॅम बेसन
३०० मिली. पाणी
२ टी.स्पू. इनो
२ टी. स्पू. मीठ
४ टी.स्पू. साखर
१ टी.स्पू. हळद
१ टे.स्पून. किसलेले आले
फोडणीसाठी-
तेल
मोहरी
हळद
धने
तीळ
हव्या असल्यास हिरव्या मिरच्या वाफवून
इनो सोडून सर्व एकत्र करून १० मि. ठेवावे. तो पर्यंत कूकरमध्ये पाणी गरम करून शिट्टी काढून घ्यावी. आता कुकरच्या २ समान आकाराच्या भांड्यांना तेल लावून घ्यावे. मिश्रणात इनो मिक्स करून पटापट फेटून घ्यावे. लगेच भांड्यांत घालून १५ मि. मध्यम आंचेवर वाफवून घ्यावे.गॅस बंद करून झाकण लगेच काढून घ्यावे. अशाने कुकरच्या झाकणांत जमा राहिलेली वाफ खालच्या भांड्यात पडणार नाही. ५-१० मि. नंतर ढोकळा ताटलीत काढून घ्यावा. अतिशय हलक्या हाताने कापून घ्यावा. साखर घातलेले पाणी ढोकळ्यावर घालावे. फोडणी घालून सर्व्ह करावा.
पाककृती ४ : पेरू
इंस्टंट ढोकळा- सोप्पी रेसिपी