Tu Stree......

तू स्त्री....
साक्षात रूप तू देवीचे
प्रतीक तू अभिमानाचे
सन्मान तू स्त्री जन्माचा
वरदान तू या निसर्गाचे !

तू कन्या....
लक्ष्मी तू प्रत्येक घरची
नका विझवू वंशाची ज्योती
उजळत राहते आपुल्या ममतेने
तिच्या ओंजळीत प्रगतीचे मोती !

तू पत्नी....
प्रेमाची पूर्ती करणारी अर्धांगिनी
संसारास देणारी सुखाची संजीवनी
प्राणाहून प्रिय तुला प्रेमाचे घरटे
विश्व सजविणारी तू स्वामिनी !

तू माता....
ईश्वराचा लाभलेला सुरेख अंश
मायेचा एक अथांग सागर
जीवनास लाभलेला अनमोल आशीर्वाद
ह्रदयात निरंतर राहणारा आदर !!!!

तू बहीण....
आईपरी माया, अतूट प्रेमाची छाया
जणू जीवाभावाची सखी
भावाचे कर्तव्य तिचे रक्षण
राखी या धाग्याची शक्ती अनोखी !

- सौ. शाल्मली ओंकार पोंक्षे

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle