(मै उपक्रमातील माझ्या ओळखीतील काही भाग इथे देत आहे ज्यांनी वाचली नसेल त्यांच्या संदर्भासाठी )
लालबागला रहात असल्याचा फायदा घेत गेल्यावर्षी मी घरच्यासाठी मसाला केला. कमी श्रमात भरपूर काम हे जीवनाचं ध्येय असल्याने मी मसाल्याची रेसिपि थोडी अल्टर केली की मला हजार मसाले वापरावे लागू नये. एक मसाला वापरला की माझं काम व्हावं. खरं तर हा प्रयोग फसू शकत होता पण नशिबाने हिट झाला.
माझ्या घरच्यांना ह्याची चव खूप आवडली. मैत्रिणींना दिला चवीला तर त्यांनाही खूपच आवडला. त्यांनी ऑर्डर देऊन परत करायला लावला मसाला. पहिली बॅच हातोहात खपली नी परत करावा लागला अशा तऱ्हेने माझा मसाला बिझनेस सुरु झाला. हा मसाला वापरून चिकन, उसळी, बिर्याणी, झुणका नी काय काय करून पाहिलं आहे माझ्या मैत्रिणींनी अजून प्रयोग सुरूच असतात
या निमित्ताने मार्केट फिरणं झालं. सहज म्हणून हळकुंड घेतली बेस्ट quality ची नी दळून आणली. ती हळद वापरताच मला साक्षात्कार झाला इतकी वर्षे मी काय भेसळ खात होते नेहमीच्या हिशोबाने हळद घातली नी पोहे केले, हळदीवे पोहे खावे लागले :biggrin: वासही मस्त होता हळदीचा.
त्या नंतर मिरची पावडर केली दोन प्रकारची, एक फक्त रंग देईल गडद नी कमी तिखट आणि दुसरी तिखट नी रंग ती ही मस्त झाली.
सध्या फिश करी मासाल्यावर आर न डी सुरु आहे, होप लवकरच परफेक्ट चव नी रंग याचा मेळ बसेल.
स्वतः जिन्नस वेचून घेणे, भाजणे, समोर उभे राहून कुटून घेणे ही प्रोसेस मी एन्जॉय करू लागले कारण रिझल्ट बेस्ट होता
तर अशी माझ्या मसालेदार स्टोरीला सुरवात झाली
ही झलक खास तुमच्यासाठी :-)
चला मिरच्या निवडून घेवू
देठ काढून घेवू
अब थोडा गरम सामान
सगळ्या सामानाचे फोटो दाखवत बसले तर काम राहायचं बाजूला चला लागू भाजायला
झालं का भाजून चला आता डंकावर
ओळखलत ना याला? मग करा कि काम सुरु
चला, न्यारे मसाले रेडी टू डीसप्याच
रेट कार्ड देखलो रे बाबा
ता क : मै वरच्या ओळखी नंतर कित्येक मैत्रिणीनी मला संपर्क केला मसाल्यासाठी पण त्यांना मी वेळेत उत्तर देवू शकले नाही याबद्दल खरच सॉरी .... आपलं घोड ट्रान्स्पोटेशनच्या प्रश्नावर अडलं होत त्याची उत्तर शोधत होते.
१) कुरियरचे मुंबई व ठाणे जिल्हा ६० रुपये प्रती किलो खर्च आहे
२) पोस्टाने पाठवल्यास खर्च कमी आहे पण पोस्टवाले मसाला पाठवण्यास तयार नाहीत
३) मुंबई बाहेर भारतात कुठेही साठी १०० रुपये प्रती किलो कुरियर खर्च
४) प्रायव्हेट बसेस ने पाठवता येईल पण त्यासाठी दोन्ही पार्टी तयार हव्यात त्यांच्या ऑफिस मधून पार्सल पिक नी ड्रोप करायला.
५) मुंबई नी जवळपासच्या लोकांना मी स्टेशनवर आणून देवू शकेन फक्त ऑर्डर एकत्र असल्या तर बर पडेल मला.
६) भारता बाहेरील मैत्रिणींना कस पोहचवता येईल पार्सल यासाठी तुम्हीच पर्याय सुचवा जो दोघांना ही जमेल असा असेल
अजून काही पर्याय तुमच्याकडे असल्यास सुचवा प्लीज :)
माझ्या छोट्याश्या व्यवसायाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
काही हॅपी कस्टमरचे फीडबॅक फोटो