ही एक माहितीतली केस आहे. सायन बाचर ह्या ५ वर्षीय मुलाला Tricuspid atresia, VSD, Severe PS, हा धमन्यांशी संबधित आजार झालेला आहे. मुलाच्या ह्रदयाला ३ भोके होती. त्यातली २ चे ऑपरेशन झाले व ते यशस्वी झाले. त्याच्यावर तातडीने ऑपरेशन होणे गरजेचे आहे. तिसरे ऑपरेशन करायला डॉक्टरांनी मागील वर्षीच सप्टेंबरमधे सांगितले होते पण पैशाअभावी पुढे ढकलेले. त्याचे वडील इलेक्ट्रीशियन असून त्यांना पैशाची आत्यंतिक निकड आहे. सर्जरीला साधारण ५ लाख रूपये खर्च येणार असून त्यातील १.५ लाख जमले असून अजुनही मोठी गरज शिल्लक आहे. डॉ. फी कमी करायला तयार नाहीत.
आधीच्या २ साठी समाजसेवी संस्थांकडुन पैसे जमवुन करु शकले पण आता पुन्हा कोणीच मदत करायला तयार नाही. तरीही बोलणी चालु आहेत.
आधी 31 मार्चला ठरलेले ऑपरेशन केवळ पैशांअभावी १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलले आहे, आणि आता मात्र ते करणं, गरजेचेच आहे. ३१मार्च तारीख सांगितली होती पण पैसे जमले नाहीत म्हणुन डॉ. ऑपरेशनला तयार नाहीत. म्हणजे ऑपरेशन लांबवल्यामुळे जो धोका आहे तो १५ एप्रिल नंतर फारच धोकादायक होणार आहे. त्यामुळे त्यांनी जवळजवळ निर्वाणीचे सांगितले आहे की १५ एप्रिलला ऑपरेशन नाही केली तर काहीही होऊ शकते.
पेशंट दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल केलेला आहे. डॉ. रणजित जगताप आहेत. शेवटचे उपाय म्हणुन आम्ही इथे लिहायचे ठरवले व व्हाटसपवर आपल्या ग्र्पला कळवण्याचे ठरवले. तोवर जितके पैसे जमतील ते जमवुन जर रक्कम पुर्ण झाली नाही तर कदाचित जीवनमरणाचा प्रश्न आहे म्हणुन फी जरा कमी होण्याची शक्यता आहे म्हणुन इथे लिहीत आहे. थेंबेथेंबे तळे साचे या न्यायाने त्या लहान मुलाचा जीव वाचु शकतो म्हणुन सगळीकडे प्रयत्न करत आहोत.
काही शंका असल्यास ,इच्छुक दीनानाथ च्या चॅरीटी डिपार्टमेंटच्या सविता वाकनीस ह्यांना संपर्क करु शकतात.चेक पाठवू इच्छिणार्यांसाठी, चेक "दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल" ह्या नावाने काढावा व चेकच्यामागे पेशंटचे नाव "सायन बाचर IPD NO/OPD NO 471354" असे लिहावे.
NEFT डिटेल्स खालीलप्रमाणे
खालील मेसेज अतरंगी ह्यांनी दिला आहे. ह्यामुळे डोनेशन त्याच व्यक्तीला जात आहे ह्याची खात्री करता येइल
: We have to send the email to charity department along with NEFT details and mention the name and opd number of patient.
: It was mentioned in word file for NEFT. pls crosscheck if all of them did that. If not pls do the same or else it will be deposited in deenanath as general donation.
जसे प्राजक्ती ने सांगितले त्याप्रमाणे , तुम्ही मला किंवा प्राजक्तीला जरी कळवले, तरी आम्ही आमच्याकडून पण crosscheck करु शकु.
संपर्क: श्री. दुलाल चंद बाचर
+919960507051
तटी: मैत्रीण.कॉमचा आर्थिक व्यवहारात काही संबंध नाही. ही पोस्ट केवळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम आहे.