सृजनाच्या वाटा : ठंडा ठंडा कूल कूल (एप्रिल-मे 2017)

cool2.png

:waving:

मोठ्ठ्या सुट्टीनंतर सृ. वा. म्हणजेच आपलं सगळ्याचं आवडतं "सृजनाच्या वाटा" पुन्हा सुरु होत आहे. येय्य!!

मध्यंतरी आलेल्या बऱ्याच नवीन सदस्यांना "सृजनाच्या वाटा" हा उपक्रम कदाचित माहित नसेल. महिन्या-दोन महिन्यांनी आपण ह्या उपक्रमातून एक विषय देत असतो. त्या विषयावर आधारीत लेख, कथा, कविता, कलाकुसर मैत्रीणच्या गुणी सदस्या नवीन धागा काढून इथे सादर करत असतात. वरच्या निळ्या पट्टीवर "सृजनाच्या वाटा" मध्ये तुम्हांला ह्या आधी झालेल्या सृ. वा. वाचता येतील.

तर ह्यावेळचा विषय अगदी अगदीच गरजेचा आहे. सूर्यनारायण डोक्यावर तळपतो आहे. पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उकाड्याने जीव हैराण होतोय अश्यावेळी गरज आहे ती आयुष्यात काहीतरी मेजर थंडगाssर असण्याची! ह्यावेळचा विषय आहे-
"ठंडा ठंडा कूल कूल"!

आईस्क्रीम-सरबतांच्या रेसिपीज पासून डोळ्यांना गारवा देईल अश्या फोटोजपर्यंत...व्हेकेशन स्पॉटपासून ते कूल समर फॅशन्सपर्यंत तसंच आपल्या किंवा इतरांच्या "कूलपणाच्या" किश्यांपासून ते उन्हाळ्यात डोकं थंड कसं ठेवावं ह्याच्या टिप्सपर्यंत... सबकुछ वेलकम आहे! बाहेर तापमान कितीही वाढत असलं तरी मैत्रीणला आपल्या ठंडा थंडा कूल कूलनी छान गार गार ठेऊया.

ह्यावरून आठवलं म्हणून आणि तुम्हांला प्रेरणा द्यावी म्हणून आत्ताच whatsapp वर आलेला जोक:
जाम आणि जेलीमध्ये काय फरक असतो?
आपल्याला जेली उकडत नाही, जाम उकडतं !! Cool Lol

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle