४ दिवसाची भारत वारी झाली, तिथून निघताना डोळे ओले होतातच. आपली माणस तर पाहिजे च असतात शिवाय हिरवाई , झाड खूप मिस करते मी.
पण कर्मभूमी मध्ये येणे भाग असते. काल रात्री परत आलो. इथल्या उन्हाळ्याच्या रखरखाटाबद्दल आम्ही तक्रार ही नाही करु शकत कारण बोलून चालून हे तर वाळवंटच. विमानातून खाली बघताना नुसते लांबच लांब पसरलेले वाळवंट दिसते..
मी आता बाल्कनीतच भर्पूर झाड लावली आहेत , बुडत्याला काडीचा आधार :)
आज सकाळी पहिल्यांदा बाल्कनीत गेले. मोगरा , चाफा , सदाफुली , डेझर्ट रोझ सगळे फुलांनी बहरले होते अगदी... जास्वंद , गोकर्ण ला कळ्या आल्या आहेत. तेव्हढेच डोळे निवले. मोगर्याची तर १० फुले , इतक मस्त वाटल.
आज हेच सृजन ह्यावेळच्या थीम साठी (नोटः हे फोटो अतिशय सुमार फोटोग्राफर ने (म्हणजे मीच) काढले आहेत , भा पो करून घ्या
आज एकदम १५ फुल आली मोगर्याला...बाल्कनी सुगंधी झाली आहे..