रेंगाळता तिरी मनाच्या
आठवांच्या अंगणी
बागेत त्या फुलांचा
धुंद गंध पेरला
रम्य कल्पना मनी
शुष्क आता जाहल्या
गोडी नव्याची सरता
पारिजात कोमेजला
जाहले शब्द मुके
जखमा त्या विखारी
हळव्या क्षणी त्या
उठता पुन्हा उरी
ओल्या पुन्हा नव्याने
आता नको अंतरी
होऊ दे आतातरी
ते भास चांदण्याचे!