हा फेमस, पॉप्युलर डायलॉग ज्या मुव्हीमध्ये आहे, त्या मुव्ही बद्दल देखील माझे मत असेच झाले आहे. 'गॉन विथ द विंड'चे कौतुक मी किमान दशकभर ऐकत आले आहे. फार पूर्वी जेव्हा गुगल व्हिडिओज नामक प्रकार अस्तित्वात होता व तिथे बरेच मुव्हीज अपलोड झाले होते, तेव्हा मी हा पाहायचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा सबटायटल्स नसल्याने मला काहीच कळले नव्हते. मग अधपाव मुव्ही पाहून सोडून दिला होता.
गेल्या आठवड्यात मी हा मुव्ही बघायला घेतला. ४ तास! :rollingeyes: मुव्ही पाहण्यासाठी ओव्हरटाईम करणे, आपल्या स्केज्युलमध्ये हलवाहलव करून मुव्ही पाहणे वगैरे प्रकार केले. तरी तीन दिवस लागले. हा एका दमात पाहणे माझ्याच्याने शक्य नाही.
मुव्ही सुरू झाला तेव्हाचे लालकेशरी आभाळ, झाडाचा silhouette, स्कार्लेटचा लहरणारा झगा ही इमेज फार मस्त होती!! मला खूप आवडली. मला मुळात हे जुने मुव्हीज, ते घेरदार झगे, ते फनी पण आदरपूर्वक बोलले जाणारे इंग्लिश हे प्रकार फार आवडतात. फार पूर्वी स्टार मुव्हीजवर खूप असे मुव्हीज लागायचे. इथेही ते आवडलंच.
पण मूळात, Scarlett is such spoiled brat! अल्लड असू शकते एखादी व्यक्तीरेखा. वेल, दुष्ट, मॅनिप्युलेटीव्हही असू शकतेच. जशी स्कार्लेट आहे. पण मग स्कार्लेटचे इतके कौतुक का ऐकू येते? :thinking: तिची व्यक्तीरेखा पाहून तरी तिचा भयंकर राग येणे अपेक्षित असेल असे वाटते. ठिक आहे, मॅनिप्युलेटीव्ह आहे. पण किती काळ सहन करायचा तो वेडेपणा? तिचं अॅश्लीवर प्रेम आहे. असं असतं का पण प्रेम?एकदा का त्या अॅश्लीचे लग्न झाले म्हटल्यावरसुद्धा स्कार्लेटचे त्याला आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न पाहून किळस आली. तिचे पहिले लग्न नावालाच होते. दुसरे लग्न पाहून परत नव्याने घृणा. र्हेटशी लग्न झाल्यावर तरी सुखाने संसार करावा, तर नाही? लेकुरवाळी, संसार असणारी बाई अजुनही त्या अॅश्लीबाबाच्या प्रेमात आहे पाहून र्हेटबाबाने कधीच आय डोंट गिव्ह अ डॅम म्हणायला हवे होते खरंतर! त्याकाळी उठाव/मोर्चे वगैरे झाले होते का हा मुव्ही पाहून? आयॅम शुअर हा विषय तेव्हा धक्कादायक वाटला असेल.
एनीवे. स्कार्लेटबद्दल जरा बरे वाटले फक्त तेव्हाच जेव्हा ती मोडकळीस आलेल्या टॅरामध्ये परत येते व अथक प्रयत्न करून थोडीफार सुधारणा आणते.[ आय विल नेव्हर बी हंग्री अगेन, हा डाअयलॉग व सीन खरंच सुंदर आहे!]
पण त्याचं पुढे काय होतं? र्हेटशी लग्न झाल्यावर ती परत उथळ होते?! मग मुव्ही संपता संपता परत तिला मातृभुमीची आठवण होते. त्याचं काय करते ते नाहीच दिसलेलं. मुव्ही (एकदाचा) संपतो.
मला माहितीय मी थोडी जास्तच सर्कॅस्टीकली लिहीत आहे. त्याकाळी अशी व्यक्तीरेखा दाखवणे हेच कदाचित क्रांतीचे लक्षण असेल. असेल. पण आत्ता मला पाहताना नाही आवडलं. पूर्ण करायचाच व शेवटी नक्की काय होतं (स्कार्लेट सुधारते की मॅनिप्युलेटीव्ह वागण्याच्या नवनवीन तर्हा दाखवते) हे बघण्याची उत्सुकता नाही म्हणायला टिकून राहिली.
एनीवे.. थोडक्यात..
फ्रँकली माय डिअर, आय हेटेड इट!
[डायलॉग मात्र छान आहे! कायम आवडत आला आहे!]