आपल्या मैत्रिणींपैकी काहींनी पटकथा शिबिरात भाग घेतला. काही कष्टाळू मुलींनी दोन्ही दिवस तर काही कमी कष्टाळूनी एक दिवस. तरिही सराव म्हणून आम्ही इथं छोटे सीन्स लिहायचं ठरवलं आहे. गोष्ट साधी आहे. तरी बघू कसं जमतंय इंटरेस्ट टिकवून ठेवायला. इथं काही नियम , पद्धती, शिकलेले मुद्दे वगैरे लिहीत नाही. ते चर्चा झाली तर येतीलच.
गोष्ट आपल्या लाकुडतोड्याची आहे. जमेल तुटकी रसाळ पणे, प्रेक्षकांना खुर्चीवर बसून राहायला भाग पाडेल अशी लिहीत राहायचं आहे.
सहभागी मुली.
अवल
विनी,
अगो,
अनु,
सन्मि
बाकी कुणाला लिहू वाटलं तरी लिहाच.
पण सीन बाय सीन. करा सुरवात. सगळी गोष्ट एकदम नाही. फक्त एक छोटा पहिला सीन.
लिहिण्या आधी चर्चा केली तरी चालेल.