थाई सूप प्रकार म्हणजे अगदी लाइट पण चविष्ट नरिशिंग
साहित्यः व्हेन काढलेले नदीतले फ्रेश प्रॉन पक्षी कोळंबी चार पाच. चिकन स्टॉक दोन कप, मध्यम कापलेले लेमन ग्रास दोन टेबल स्पून. काफीर लाइम ची पाने चार तुकडे केलेले गलांगल पक्षी थाई आले. मशरूम्स तुकडे करू न ५० ग्राम. लिंबाचा रस दोन टेबल स्पून. फिश सॉस दोन टेबल स्पून. कापलेली लाल किंवा हिरवी फ्रेश मिरची. एक टी स्पून. चिली ऑइल एक टी स्पून. कोथिंबीर सजावटी साठी.
कृती: एकदम सोप्पी. चिकन स्टॉकला उकळी आ णायची. त्यात लेमन ग्रास, गलांगल व मशरूम्स चे तुकडे घालायचे. मग रिव्हर प्रॉन घालून मध्यम आचेवर उकळी आणायची. प्रॉन शिजले पाहिजेत पण ओव्हरकुक करायचे नाही. रबरी होतील. मग लिंबाचा रस, फिश सॉस मिरची चे तुकडे चवीनुसार मीठ व चिली ऑइल घालून आपल्या आवडी नुसार सीझन करा. झाले. बोल मध्ये गरम गरम सूप ओतून वरून ताजी कोथिंबीर पेरून सर्व्ह करा. वरील साहित्यात दोन सर्विंग्ज होतील. आपल्याला हव्या त्या पटीत साहित्य वाढवून घ्या.
प्रॉन मधील काळी व्हेन नक्की काढा. ती खाल्ल्यास पोटाला त्रास होउ शकतो
मूळ रेसीपीत मीठ नाही. आपण चवीनुसार घालून घ्या. तुमच्या तिथल्या हिवाळ्यात थोड्या
एशिअन वॉर्म्थसाठी जीव तरसला तर हे सूप बनवून प्या. पट्टाया च्या तिथल्या बीच वर पडल्या सारखे आतून समाधान वाटेल.