ही एक मेन कोर्स डिश आहे. बरोबरीने भाताचा कोन हवा.
साहित्यः चिकन ब्रेस्ट चे बारके तुकडे. अगदी बारके नव्हे एक इंच बाय एक इंच चालतील. मुंबईत असे कापलेले पाकीट मिळते फ्रोझन सेक्षन मध्ये किंवा झोराबिअन चे चिकन ब्रेस्ट तीन तुकडे असलेले पाकीट मिळते. हे १४० ग्राम. थाई ग्रीन करी पेस्ट. नार ळाचे दूध. मी डाबरचे रेडीमेड वापरते. एका पाकिटात एक नारळाचे घट्ट दूध अस्ते हवे तसे पातळ करून घ्यायचे. टेट्रा पॅक बिग बास्केट वर उपलब्ध आहे. एक छोटे वांगे . मी लाइफ मध्ये कधी वांगे खाल्लेले नाही. पण रेसीपीत आहे. पी एगप्लांट १०० ग्राम हे पण रेसीपीत आहे मिळाल्यास घाला नाहीत्र सोडून द्या चवीत फरक पडत नाही. काफीर लाइमची पाने, फ्रेश लाल मिरची, स्वीट बेसिलची पाने. फिश सॉस एक टेबल स्पून, पाम शुगर एक टेबल स्पून ही न मिळाल्यास आपली साखर एक चमचा घालता येइल. व तेल.
कृती: दोन चमचे तेल पॅन मध्ये घेउन मध्यम टू मंद आचेवर ग्रीन करी पेस्ट फ्राय करून घ्या. वास सुटला की हळू हलू नारळाचे दूध घाला. व मंद आचेवर मिक्स करा नारळाच्या दुधाचा कच्चे पणा जाउन तेल सुटू लागले की चिकन व वांग्याचे तुकडे घाला. पाच दहा मिनिटे शिजू द्या. मग फिश सॉस व पाम शुगर, मीठ इत्यादि घालून चवी प्रमाणे अॅडजस्ट करून घ्या. काफीर लाईमची पाने तीन मोजून घाला. शिजल्या नंतर स्वीट बॅसीलची पाने व फ्रेश रेड चिलीचे लांबट कापलेले तुकडे घालून सर्व्ह करा. हिरव्या करीवर लाल मिरची शोभून दिसते.
भात बोल मध्ये घेउन वरून चिकन करी असे दिले व एक फोर्क बरोबर दिला की काम भागते. हे तुम्ही थकून भागून आल्यावर पंधरा मिनिटात करू शकाल. सर्व पदार्थ असले तर फार कटकटीची रेसीपी नाही. इल्क्ट्रिक कुकर वर भात लावायचा. करी बनवायची व मंद आचेवर ठेवून मग एक क्विक शावर घेउन यायचा. बोल मध्ये घेउन नेट फ्लिक्स/ माबो / अमेझॉन प्राइ लावून मस्त वर्किंग डेचे डिनर करायचे. यू डिझरव दिस गर्ल.