श्रावण सरता भाद्रपदाची चाहुल लागता सहनिवासाच्या रस्त्यावर कमान केलेली गगन जाई आपल्या आगमनाची वर्दी देते हळूच मोहक टवटवीत फुल डोईवर पडते,अश्विनातल्या घटस्थापनेला या आकाशनिंबाने छान झुंबरे लावलेली असतात ,दोबाजुनी अशा या उंचच उंच चढवलेल्या कमानीवर शुभ्र झुंबरे विराजमान असतात,पावलापावलाशी मग टपोरी सुगंधाची आरास आणि ते मोहक जीव न दुखवता जपून पाऊल टाक जरा चालीवर आपल्याला चालायचे असते.
आसमंत मोयांन मोयांन सुगंधाने भरून जाते,श्वास सुगंधाचा होतो आणि आता प्रभातफेरीला जायचा मोह अनावर होतो.चार पाकळ्यांची ही मधाळ फुले पराग कण स्तंभिका समूहात ठेवूनच येतात,त्यावर इवले कीटक मधुमक्षिका भृंग, इवलाल्या वलकुल्या ,चष्मेवाले असे छोटुकले पक्षी गुजराण करतात.
धवल विनम्र सड्याच्या पायघड्यानी सजलेले हे रस्ते या काळात चालणाऱ्या माणसाला महत्ता बहाल करून जातात ही फुले.
टवटवीत फुलांचा हा सडा वेचून त्याच्या वेण्या करून व फुलदाणीत विराजमान करून सुगंधाची अत्तर कुपी घराला प्रसन्न करून जाते. दिवाळी पर्यंत या फुलांची ही सुगंधी साथ आणि सुंदर थंडीची चाहूल फुलांना हलकासा गुलाबी रंग छटा बहाल करते.
ऋतुचक्राच्या आंबाड्यावर गंगनजाईचा हा वळे सर माळतो आणि चैतन्याच्या मूर्तिमंत शक्तीचा हा जागर विश्वकर्मा साजरा करतो.
रश्मी भागवत
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle