कोबीची बोअरींग भाजी चविष्ट करण्यासाठी:
भाज्या - कोबी, सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो ह्या भाज्या लीड रोलमधे.
बाकी साईड रोलसाठी पिवळे कॉर्न, बेबी कॉर्न, मटार, रंगीत सिमला मिरची, गाजर वगैरे भाज्या आपापल्या आवडीप्रमाणे किंवा फ्रिजात सापडतील तश्या.
चवीसाठी: पावभाजी मसाला किंवा गरम मसाला, थोडं टोमॅटो सॉस, मीठ, साखर, थोडीशी हळद, लाल तिखट.
तेल किंवा बटर.
कोबी, कांदा, सिमला मिरची श्रेड करायची. टोमॅटोच्या मध्यम फोडी करायच्या.
गरम तेलात किंवा बटरात सगळ्या भाज्या एकदम घालायच्या.
त्यात किंचीतच हळद, लाल तिखट, पावभाजी किंवा गरम मसाला, थोडं टोमॅटो सॉस, मीठ, साखर घालून झाकण न ठेवता परतून परतून भाजी करायची.
हीच भाजी पिझ्झ्यासाठी किंवा टोस्ट सँडाविचसाठी हवी असेल तर गरम तेलात मिक्स हर्ब्स घालायचे, मग भाज्या मसाले घालून परतून भाजी करायची.