साहित्य
२ कश्मिरी लाल सुक्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल)
१ हिरवी मिरची (चवीप्रमाणे कमी जास्त करता येईल)
१ टीस्पून जिरे
१ टीस्पून कश्मिरी गरम मसाला / नसेल तर साधा गरम मसालासुद्धा चालेल
१/२ टीस्पून बडीशेप - साधा साधा गरम मसाला वापरणार असाल तर (काश्मिरी मसाल्यात कदाचित बडीशेप असू शकेल)
१ मोठा टोमॅटो
१ इंच आले
५-६ लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून किसलेले खोबरे / नसेल तर खवलेला नारळसुद्धा चालेल
१ मोठा कांदा उभा चिरून
१ टीस्पून हळद
१ चिमूट केशर
१ टेबलस्पून दही
६०० ग्रॅम बोनलेस लँब चॉप्स (लँब कमी असेल तर त्या प्रमाणात कॉलिफ्लॉवर किंवा बटाटा किंवा कॅप्सिकम टाकले तरी चालेल. भाज्या चिरताना जेवढ्या आकाराचे लँब चॉप्स असतील तेवढाच आकार ठेवा)
१/२ टेबलस्पून तेल
१०-१२ बदाम
चवीप्रमाणे मीठ
पद्धत
१. बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा.
२. लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, जिरे, गरम मसाला, टोमॅटो, आले, लसूण आणि खोबरे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. गरज असल्यास थोडे पाणी घातले तरी चालेल.
३. लँब चॉप्स स्वच्छ धूवून घ्या. फ्रोझन असतील तर डीफ्रॉस्ट करून घ्या.
४. एका कढईमध्ये तेल घ्या.
५. तेल तापले की उभा चिरलेला कांदा मंद आचेवर चांगला लालसर परतून घ्या.
६. संपूर्ण पाककृती करताना आच मंद ठेवा.
७. कांदा परतल्यानंतर त्यात मिक्सरमधील मसाला टाका.
८. ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
९. मसाल्याला तेल सुटले की त्यात लँब चॉप्स टाका.
१०. हवे असल्यास किंचित पाणी घाला. कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे लँब शिजवून घ्या.
११. लॅंब शिजल्यानंतर त्यात दही, हळद, केशर, मीठ, भिजवलेले बदाम टाका. ढवळून घ्या.
१२. भाज्या घालणार असाल तर भाज्या घाला पुन्हा थोडे ढवळून घ्या. गॅस बंद करून १० मिनिटे झाकण ठेवा. भाज्या वाफेवर शिजतील.
१३. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने गार्निश करा.
१४. सॅफ्रन राईस बरोबर खा (बासमती तांदुळाचा फडफडीत भात करताना त्यात थोडे केशर घातले की सॅफ्रन राईस तयार).
*मला काश्मिरी लँब ची रेसिपी ऑनलाईन सापडली त्यात मी आणि +१ ने आमच्या मनाने थोडे फेरफार करून काल काश्मिरी लँब चॉप्स + कॉलिफ्लॉवर करी केली. त्याची ही रेसिपी.
हा फोटो