मै कर सकती है - तुम्हारी सुलु

सिनेमा आवडलाच.
पण विद्या बालनचा अभिनय जास्त आवड्ला.नवरा व मुलावर जिवापाड प्रेम करणारी टिपिकल मध्यमवर्गीय
गृहिणी, रोजचं चाकोरीबद्ध आयुष्य जगतना स्वतःच्या आयुष्यातही काहीतरी भव्य-दिव्य करुन दाखवायचं स्वप्न बघणारी, बँकेत काम करणार्‍या २ मोठ्या बहिणींकडून व वडिलांकडून सतत '१२th मै तीन बार दांडी गुल' म्हणुन हिणवली जाणारी 'सुलु' तिनी खास रंगवलिये.

मुलाच्या शाळेतल्या लिंबु-चमचा स्पर्धेत भाग घेउन जिंकते, सोसायटितल्या वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेते. वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज काढते व कायम त्यात डुबते म्हणून बहिणींकडुन टॉन्ट्स खाणारी.

नवराही आधी बराच सपोर्टिव दाखवलाय पण ती 'उंबरठ्या'बाहेर पडल्यानंतर घरावर उद्भभवलेल्या संकटात, तिच्या बहिणींच्या "हो ला हो" करत सगळं खापर तिच्यावर फोडून मोकळा होतो. तेंव्हा तिला नवर्याच्या बदललेल्या अ‍ॅटिट्युडने आधी धक्का बसतो व नंतर हताश होउन बॉसला 'मला हे सगळं खरतर आवडतंय पण नाईलाज आहे माझा' म्हणतान तिला अश्रू आवरत नाहीत.

बॉस म्हणून इथे मला नेहा धुपियाही आवडली व सपोर्टिव रोल मधे RJ Malishka पण.आधी तिच्या कुकर नको टिवी रिप्लेसमेन्ट हविये वरुन तिच्या मागून तिची थट्टा करणार्या पण तिच्या क्वालिटिज पाहून नंतर तिला फुल सपोर्ट करणार्‍या, तिच्या नोकरी सोडण्याच्या वेळी ईमोशनल झालेल्या.

RJ म्हणुन काम करताना विद्या बालनने पहिल्या प्रसंगापासुन धमाल उडवलिये. ती नोकरी मिळावी म्हणून तिने केलेली धडपड व
स्वतःच्या बळावर ती तो रोल इतका उत्तम निभावून नेत असते की तिला समोर बसून प्राँप्ट करणार्‍या रेडिओ वरच्याच एका स्टाफ -कम-कवि ला नेहा धुपिया चुप बसवते तू प्रॉम्प्ट करु नकोस म्हणून...!!

इकडे सुलुच्या नवर्याचा मात्र ऑफीसचं मॅनेजमेंट बदलल्यापासून फक्त अपमानच होत असतो व एक एक जबाबदारीची काम त्याच्याकडून काढून घेतली जात असतात. ह्याबद्द्ल तो बायकोशी कधी काहीच का बोलत नाही काय हे कळल नाही. तो एक्दम तिला नोकरी सोडण्याचं सांगतो तेंव्हा ती ही काही विचारत नाही की का सोडतोयस? फक्त त्याला आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करु एवढंच म्हणते.

सुलु नोकरीसाठी बाहेर पडल्यावर तिची व्यक्तिमत्व बहरतं, तिचा आत्मविश्वास वाढतो पण तिचा तो सालस साधा स्वभाव, मध्यमवर्गियपण न बदलता. एका रात्रीत चमत्कार होऊन ती बदललीये म्हणजे एकदम वेस्टर्न कपडे घालायला सुरूवात केलिये, ड्रिंक्स घेतिये, त्यातुन तिच्यातला व तिच्य नवर्‍यातला दुरावा वाढणार असं काही दाखवतायत का काय असं मला वाटत होतं, तसं काही झालं नाही. टचवुड. RJ म्हणुन काम करताना पण तिची सैल्सर वेणी,साधी साडी हा रोजचा पेहराव बदलत नाही.

गाणं एकच आहे ते काही फार लक्षात रहण्यासारखं वाटलं नाही. खरंतर त्या एका गाण्याचीही व हवाहवाई गाण्याचीही गरज नवह्ती.
सर्प्राईज गेस्ट अ‍ॅपिरीयन्सही आवडला.

सिनेमा शेवटाकडे जाताना तो एकदम घिसापिटा शेवट होणार अशी चिन्हं दिसू लागल्यावर मी वैतागले. शेवटी बाईच्या हाती पोळपाट लाटणंच दाखवणार का, असा विचार मनात आला असतानाच सगळं बदललं आणि सिनेमा आणखीच आवडून गेला.

सगळ्यांनी विथ फॅमिली पहावा असा सिनेमा आहे.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle