या आठवड्यात स्टॉकहोम, स्वीडन येथे २०१७ च्या नोबेल पुरस्कारांचा वितरण सोहळा आहे. यावर्षीचा ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर हा आठवडा 'नोबेल वीक' म्हणून साजरा होणार आहे.
मागच्या वर्षीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे दुसरे आवर्तन आज सुरू करीत आहोत. या उपक्रमाअंतर्गत दर वर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची आणि त्यांच्या कामाची ओळख, मराठीतून, सगळ्यांना समजेल अशा संक्षिप्त स्वरूपात करून देण्याचा आपण प्रयत्न करतो.
या वर्षीचे नोबेल पुरस्कार विजेते:
- भौतिकशास्त्राचे नोबेल : Rainer Weiss(रेनर वाईस), Barry Barish(बॅरी बॅरीश), Kip Thorne(किप थॉर्न)
- रसायनशास्त्राचे नोबेल : Jacques Dubochet(जॅक डबुशे), Joachim Frank(योहिईम फ्रँक), Richard Henderson(रिचर्ड हँडरसन)
- वैद्यकशास्त्राचे नोबल : Jeffrey C. Hall(जेफ्री सी हॉल), Michael Rosbash(मायकेल रॉसबॅश) आणि Michael W. Young(मायकेल डब्ल्यू यंग)
- साहित्यातील नोबेल : Kazuo Ishiguro(काझुओ इशिगुरो)
- शांततेसाठीचा नोबेल : International Campaign To Abolish Nuclear Weapons(ICAN)
- अर्थशास्त्रातील नोबेल : Richard H. Thaler(रिचर्ड थेलर)
याशिवाय मागच्या वर्षीच्या नोबेलविषयीच्या रोचक माहितीतला नवा अंक
नोबेल पारितोषिकाविषयी - १
नोबेल पारितोषिकांविषयी - २ (नोबेल विजेते आणि त्यांच्या सुरस गोष्टी!)
नोबेलचा शांतता पुरस्कार आणि महिला विजेत्या!