अम्मा मग मुंबईला गेल्या . श्रीकांत ची तयारी सुरु झाली लंडन ची आणि सुधाने थोडे दिवस मुंबईला राहायचे असा ठरले . घर बंद केले. सगळे दागिने लॉकर मध्ये ठेवले. अम्मा नाराज कारण त्यांना लॉकर आवडत नाही . पण प्रॅक्टिकल विचार तोच होता.
सुधाला एव्हाना लक्षात आला होत कि अम्मान काहीच पटत नाही पोळ्या केल्या तर त्यांना फुलके हवे असतात आणि ओहुलके केले तर " तुला काम कमी म्हणून करतेस पोट भरत नाही त्याने म्हणणार. बार वाइचारायला गेल तर " सासूच्या मनात काय आहे ते न सांगता कळायला पाहिजे . कसली तू बावळट" म्हणून ओरडणार. सुधाला कळेना काय करावे कस वागावे म्हणजे हे सोपं होईल . सुद्धा चे सगळे ड्रेसेस अम्मांनी मोलकरणीच्या मुलीला दिले. त्यामुळे तिला सारखी साडीच नेसावी लगे. रोज पाच ला उठायचे दूध घ्यायचे तापवायचे आणि अम्मांची वाट बघायची . चहा कॉफी घ्यायची सोय नाही अम्मा लगेच ओरडायच्या " तुझा लाड कोड बंद कर मी चहा घेतल्याशिवाय सुनेने च्यायला नाही " म्हणून. सुधाला आपण १७०० च्या काळातली सासुरवाशीण असल्यासारखा वाटायला लागलं . अम्मा दोन वेळा जेऊ द्यायच्या बास इतर काही तोंडात टाकायचं नाही का तर " तू जाड होशील मला जाड मुली आवडत नाहीत" श्रीकांत ची पत्र आणि फोन ची वाट बघत सुद्धा दिवस काढत होती. दोन महिन्यात सुद्धा निम्मी झाली. थकलेली दिसायला लागली. अम्मा सारख्या मागे असायच्या काही सुचू द्यायच्या नाहीत " हिला मी सरळ करणार " असं सगळ्या नातेवाईकांना सांगायच्या. पण मुळात वाकडं आहे का काही ? आज काळ असा सासुरवास फक्त टीव्ही वर दिसतो असा सुधाचा समाज दूर झाला . ती श्रीकांत ची वाट बघायला लागली. आणि अम्मान बरोबर थोडी कुरबुर वाढली.