सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.
लग्न ठरल्यावर श्रीकांत पुण्यात राहिला कारण त्याच ऑफिस पुण्यात अम्मा मुंबईला मोठ्या मुलाकडे. मग सुद्धा श्रीकांत ने घर घेतल्यावर मात्र अम्मा पुण्यात आल्या. सुद्धा रोज भेटायला जायची तवे थोड्या बोलायच्या सूर जरा चढ असायचा. सुधाला "जाड होशील जरा काम करत जा " वगैरे सांगायच्या. सुद्धा ची फिरायची नोकरी त्यामुळे तशी ओढाताण व्हायची म्हणून तिने जास्त लक्ष दिले नाही.
लग्न कुठल्या पध्हद्तीने करायचे ह्यात अम्मांनी पहिला वाद घातला. पारंपरिक पद्धती हव्या मला नवीन काही आवडत नाही. शॉर्टकट नको इतकं मग तसच केल. सुधा बरोबर साडी खरेदीला गेल्या तिच्या पसंतीला नIवे ठेवत सIद्य घेतल्या. अगदी सुधा गोरी पण असून " तुला जांभळा रंग चांगला दिसणार नाही" अस सुद्धा म्हणाल्या. सुधा ने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि हवी ती साडी घेतली श्रीकांत कडे पाहून. मग लग्न झाल्यावर तर दुसऱ्या दिवसापासून सुधा किचन मध्ये आणि अम्मा बाहेर असं सुरु झालं. सुधा साठी म्हणून अम्मांनी ५ चा दूधवाला लावला का तर " तुला उरक नाही सगळं आटपून जात जा ऑफिस ला मी काही करणार नाही आता , सून कशाला आणली मग" सून किचन सांभाळण्यासाठी आणतात का फक्त ? सुधा च्या घरी असं नव्हत आई आजी सगळे मजेत असायचे म्हणजे स्वयंपाक मिळूनच करायच्या. इथे अम्मानI काही विचारल तर " तू मराठी आहेस म्हणून मला घरात नकोच होतीस मला कन्नडिगा हवी होती सून" पण मग तिने अस सगळं ऐकून घेतल असत का हे म्हणल्यावर लगेच श्रीकांत कडे " उलट उत्तर देते " म्हणून तक्रार. सुधाला कस वागावे कळेना. रोज कटकट ऐकून वेड लागेल असा वाटायला लागल. आणि श्रीकांत ची लंडन ला बदली झाली.
मग सगळी गडबड झाली. आधी श्रीकांत जाणार मग सुद्धा असं ठरला. अम्मा चिडल्या रडल्या
" सुधाला कशाला नेतोस ठेव इकडेच "म्हणाल्या
सुधा घाबरलीच अम्मांबरोबर कायम राहायचे ते सुद्धा श्रीकांत शिवाय
अम्मा मग मुंबईला गेल्या . श्रीकांत ची तयारी सुरु झाली लंडन ची आणि सुधाने थोडे दिवस मुंबईला राहायचे असा ठरले . घर बंद केले. सगळे दागिने लॉकर मध्ये ठेवले. अम्मा नाराज कारण त्यांना लॉकर आवडत नाही . पण प्रॅक्टिकल विचार तोच होता.
सुधाला एव्हाना लक्षात आला होत कि अम्मानI काहीच पटत नाही पोळ्या केल्या तर त्यांना फुलके हवे असतात आणि ओहुलके केले तर " तुला काम कमी म्हणून करतेस पोट भरत नाही त्याने म्हणणार. बार वाइचारायला गेल तर " सासूच्या मनात काय आहे ते न सांगता कळायला पाहिजे . कसली तू बावळट" म्हणून ओरडणार. सुधाला कळेना काय करावे कस वागावे म्हणजे हे सोपं होईल . सुद्धा चे सगळे ड्रेसेस अम्मांनी मोलकरणीच्या मुलीला दिले. त्यामुळे तिला सारखी साडीच नेसावी लगे. रोज पाच ला उठायचे दूध घ्यायचे तापवायचे आणि अम्मांची वाट बघायची . चहा कॉफी घ्यायची सोय नाही अम्मा लगेच ओरडायच्या " तुझा लाड कोड बंद कर मी चहा घेतल्याशिवाय सुनेने च्यायला नाही " म्हणून. सुधाला आपण १७०० च्या काळातली सासुरवाशीण असल्यासारखा वाटायला लागलं . अम्मा दोन वेळा जेऊ द्यायच्या बास इतर काही तोंडात टाकायचं नाही का तर " तू जाड होशील मला जाड मुली आवडत नाहीत" श्रीकांत ची पत्र आणि फोन ची वाट बघत सुद्धा दिवस काढत होती. दोन महिन्यात सुद्धा निम्मी झाली. थकलेली दिसायला लागली. अम्मा सारख्या मागे असायच्या काही सुचू द्यायच्या नाहीत " हिला मी सरळ करणार " असं सगळ्या नातेवाईकांना सांगायच्या. पण मुळात वाकडं आहे का काही ? आज काळ असा सासुरवास फक्त टीव्ही वर दिसतो असा सुधाचा समाज दूर झाला . ती श्रीकांत ची वाट बघायला लागली. आणि अम्मान बरोबर थोडी कुरबुर वाढली.
आणि मग एक दिवस तिचा पण व्हिसा झाला. श्रीकांत ने सगळ्या इंस्ट्रुशन्स दिल्या आणि सुधा ने तयारी सुरु केली. अम्मा जास्तच चिडायला लागल्या पण मग काहीच बोलेनाश्या झाल्या. सुधा शेवटी लंडन ला पोचली.
सगळं या सुरवातीला वेगळ होत. नवी जागा नवी भाषा मोठी सुपर मार्केट्स . थंड हवा . पण मग सवय झाली. स्वैपाक दोघांचा आणि वीकएंड ला मित्र परिवार मिळून पार्टी नाहीतर मग बाहेर फिरायचे. तिला खूप आवडले सगळे. अम्मांचा आवाज फक्त फोनवर यायचा तेवढाच. त्यांच्या सूचनांना ती हो हो करायची . पण इथे सगळं इंडिया सारखं नाही हे सांगून टाकले मग त्या जरा नाराज झाल्या.
सुधा ची तब्येत सुधारली . परत हसायला लागली श्रीकांत बरोबर मजेत राहायला लागली. नोकरी पण सुरु केली . रोजच जाणं येणं आणि घर सांभाळणे ह्यातच तिचा वेळ जायचा . मग अम्मान बोलावून घेतला. अम्मा घरी आल्या आणि इकडेतिकडे बघत म्हणाल्या " घर छान संभाळतेस हो तू मला काळजी नाही आता " नंतर महिनाभर कौतुकाने राहिल्या आणि सुधा ला छान वाटलं . अम्माची भीती वाटेना अगदी खूप कोंडून ठेवल्यावर मोकळ वाटलं.