सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो

परवा रेहमानच "जरिया" हे कोक स्टुडीओ मधल गाण ऐकत होते , जरीया म्हणजे माध्यम. तुमची भाषा देश वेश कसाही असो पण तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला त्याने [देवाने] सृजनाचा फार मोठा आनंद बहाल केला आहे असा त्या गाण्याचा साधारण अर्थ होता , तमाम आई पणाचा आणि अनुषंगाने स्त्री पणाचा गौरव त्यात होता ऐकून खूप छान वाटल , माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले की जेव्हा मला मी स्त्री आहे याचा अतिशय अभिमान आणि आनंद वाटला , परंतू हे सर्व टिकल ते माझी आणि सोराया ची ओळख होई पर्यंत , माझी आणि तिची ओळख झाली आणि मी नखशिखांत हादरले.
माझी आणि सोराया ची ओळख चित्रपटाच्या माध्यमातून झाली चित्रपटाच नाव होत "STONING OF SORAYA M ". खर तर नावच तिची निम्मी गोष्ट सांगून जात , पण एक वेळ चित्रपटात अशी येते की खूप अगदी पोटातून ओरडावस वाटत , रडावस वाटत , helplessness काय असतो ते सारख डाचत राहत आणि शेवटी आपण वेदनेच्या न संपणाऱ्या आवर्तात गटांगळ्या खात राहतो .
सोराया साधी मुल बाळ असलेली आणि नवर्याने थोड प्रेमाने वागाव अशी अपेक्षा असणारी सर्व सामान्य स्त्री , तिचा अपराध एकच की ती आता तिच्या नवर्याला नकोशी आहे कारण एका कोवळ्या नी तरुण मुलीवर त्याच प्रेम जडल आहे , इथपर्यंत सगळी गोष्ट अगदी सामान्य परंतू हातात रोजगार नसलेली आणि घटस्फोट झाला की मुलांपैकी मुलीना, केवळ मुलीना घेऊन तिने वेगळ व्हाव असा प्रस्ताव समोर असलेली सोराया अर्थातच या सगळ्याला नकार देते , आणि मग सुरु होतो निरागस सोराया ला एका अतिशय दुष्टचक्रात अडकवण्याचा कट . नोकरीच लालूच दिल जात आणि ही भाबडी, डोळ्यात नवे आणि सुटकेच स्वप्न घेऊन
ते लालूच खूप आशेने स्वीकारते आणि मग तिच्या समोर पुरुषी सत्तेचा चेहरा उलगडतो जो फक्त भयावहच नसतो तर जीवघेणा असतो , अनेक काथ्याकुट करून तिचा नवरा ती व्यभिचारी आहे हे सिध्द करतो आणि व्याभिचाराला एकच शिक्षा ती म्हणजे दगडाने ठेचून मारणे आणि त्याहून दुर्दैव म्हणजे यात तिच्या मुलांसकट जन्मदात्या पित्या पर्यंत सगळ्यांनी सहभागी व्हायचं असत . या अग्निदिव्याला सामोर जाताना ती तिच्या मावशीला म्हणते " मरण्याची भीती वाटत नाही तर अश्या मरण्याची भीती वाटते " तिचा चेहरा अतिशय शांत पण काळजाला घर पाडणारी तिची शांतता क्षणभर आपल्याला तिच्या जागी उभी करते आणि तिथून नकळत आपला हि प्रवास सुरु होतो , हात पाठीमागे बांधून तिला खड्ड्यात कमरेपर्यंत पुरलं जात , पहिला दगड भिरभिरत येतो आणि तिच्या नितळ कपाळावरून चरचरीत रक्तरेषा उमटते ती रेष रेष नसते ती तलवार असते जी सबंध माझ आयुष्य चिरफाड करून माझ्या समोर ठेवते . तिच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर भिरभिरत येणारा प्रत्येक दगड ,तिला इजा करणारा प्रत्येक दगड , जणू काही ती लोक " हा तुझ्या शिक्षणावर , हा तुझ्या स्त्री असल्याचा अभिमानावर , हा तुला जग बदलत येणार नाही यावर , हा तुझ्या पुरुषाशी खांद्याला खांदा लावून उभी आहेस या दर्पोक्ती वर " असा म्हणून अवघ्या स्त्रीत्वावर तो घाव घालतयेत असा वाटून मन सैरभैर होत , सगळ सगळ माझ्यातलं गळून पडत मी काय करू शकते यावर विचार करायची ताकद माझ्यात उरत नाही , मी खरच फार खुजी अप्पलपोटी आहे हि भावना अगदी दाटून येते.
मी स्त्रीवादी वगैरे कधीही नव्हते पण एका माणसाला मनासारख जाऊदे पण निदान माणसासारख जगायचं तरी अधिकार द्या , women's day असा वेगळा साजरा करायची कदाचित गरज भासणार नाही , फक्त जगू द्या इतकच हव आहे. ज्या देवाच्या, अल्ला च्या नावाखाली माणसाची पिळवणूक चालते त्याला एकच विनंती आहे कि शंभर पाप होईपर्यंत शंभर बळी हि जातात रे हे थांबवण्याची शक्ती दे किंवा सहन करण्याची ताकद
एक कविता वाचली होती त्या दिवशी पासून तीच सारखी डोक्यात घोळते आहे , आता खरच हि वेळ येउन ठेपलिये अस वाटत ,

सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविन्द ना आएंगे!
छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,
खुद ही अपना चीर बचा लो,
द्यूत बिछाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे!
सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविन्द ना आएंगे!
कब तक आस लगाओगी तुम, बिके हुए अख़बारों से?
कैसी रक्षा मांग रही हो, दु:शासन दरबारों से?
स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं, वे क्या लाज बचायेंगे?
सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविन्द ना आएंगे!
कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है,
होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है,
तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको क्या समझाएंगे?
सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविन्द ना आएंगे!
कवी :- Pushyamitr Upadhyay

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle