सॉसः ऑलिव्ह ऑईलवर १०-१२ लसूण पाकळ्या बारीक चिरून परतून घ्यायच्या. ऱोझमेरीच्या ३ मोठा काड्या, ऑरेगानोच्या ३-४ काड्या, थाईमच्या ३-४ काड्या अशी सगळी मोळी बांधून टाकायची. त्यावर ३ शॅलटस बारीक चिरून चांगले परतून घ्यायचे. शॅलटस ऐवजी पांढरे/पिवळे कांदेपण चालतील. आवडत असल्यास एक कप बारीक चिरलेली सेलरी घालायची. सॅन मरझानो टोमॅटोचे कॅन्स कुठल्या ग्रोसरी स्टोअर्समधे मिळतात, ते दोन कॅन्स घालयचे. टोमॅटो बारीक चिरून घालू शकता किंवा आख्खे घालून मॅश करू शकता. १० - १५ मिनीटे बारीक गॅसवर चांगले शिजवायचे. मीठ, मिरपूड, क्रश्ड रेड पेपर, एक चमचा ब्राऊन शुगर घालायची. साखरेमुळे आंबटपणा बॅलन्स होतो. पण सॉस आंबट नसेल/गरज वाटली नाही तर तुम्ही साखर वगळू शकता. चांगले शिजले की हर्ब्जची मोळी बाजूला काढून टाकायची. सॉस चंकी हवा असेल तर तसाच ठेवा. स्मूथ हवा असेल तर मिक्सरवर बारीक करूण घ्या. वरून १/४ कप हेवी क्रीम घालायचं. क्रीम पण ऐच्छिक आहे. हा सॉस आधी करून ठेवता येतो.
भाज्या: झुकिनी, यलो स्क्वाश, मश्रूम्स, अॅस्पॅरागस, पालक, बारीक तुकडे केलेली ब्रोकोली लसूण घालून ऑऑ वर चांगले परतून घेतले. मीठ मीरपूड, क्रश्ड रेड पेपर पावडर घालून सगळे नीट हलवून घेतले. पाणी सुटू द्यायचं नाही. गार झाल्यावर रीकोटा चीज, पार्मजान चीज घालून नीट मिक्स केले.
लसान्या शीटस शिजवून घेतल्या. एक एक शीट घेऊन त्यात फिलींग भरून रोल्स केले. बेकींग पॅनमधे खाली सॉस घातला. वर सगळे रोल्स ठेवले. वरून परत सॉस घालून पार्मजान, पार्मजिअॅनो-रीजिआनो चीज, थोडे ब्रेडक्रम्स घालून ३५० वर २५ मिनीटे बेक केले. सॉस जास्त करून घातला तर बरोबर बाकेत ब्रेडचे स्लाईसेस द्यायचे लावून खायला.