मासवड्या

मी शुक्रवारी गावावरून आजी आलेली आणि मला कधीच्या शिकायच्या होत्याच म्हणून आजीच्या सुपरविजनखाली मासवड्या बनवायला शिकले.
घरी जवळजवळ 20 -22 जण होते त्यामुळे भरपूर बनवल्या त्यामुळे आता कधी विसरणार नाही मासवड्या Heehee

हा फोटो ( घरच्या पाहुण्यांची संख्या बघून कामवालीने पळ काढलेला म्हणून आयत्यावेळी आयत्या आणून दिलेल्या थर्माकोल प्लेट्स वापरल्या,खरतर मी विरोधात असते थर्मोकोल वापराच्या पण कधी कधी दुसरा ऑप्शन नसतो )

20180226_185458.jpg

मासवड्या -
पहिले मासवडी रस्सा बनवते मी तर त्यासाठी 5-6 लवंगा आणि मिरी, शहाजीरे, जिर, वेलची, दालचिनी,तमालपत्र,2 कांदे उभे चिरून, अर्धी वाटीभर सुक्या खोबर्याचा खीस, चमचाभर खसखस हे सगळं भाजून 6-7 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीरिसोबत वाटून घ्यायच.मग कढईत तेलावर हिंग आणि पाव चमचा तिखट घालून हे वाटण घालून तेल सुटेस्तोवर परतून घ्यायच. वाटणाला तेल सुटायला लागलं की तिखट हळद,मीठ आणि गरम मसाला घालून तीन चार मिनिटं परतून मग जितका रस्सा हवाय त्या अंदाजाने पाणी घालायचं आणि बारीक गॅसवर उकळू द्यायचा हा रस्सा. गावाला ह्या वाटणात चमचाभर बाजरी पण भाजून वाटतात पण माझ्याकडे बाजरी नव्हती म्हणून मी वापरली नाही.
आता मासवडीच्या सारणासाठी अर्धी वाटी तीळ, 6 चमचे खसखस,एक वाटी सुक्या खोबऱ्याचा बारीक किसलेला किस, एक बारीक चिरलेला कांदा, 10 - 12 पाकळ्या लसूण , मीठ, तिखट आणि मूठभर किंवा जास्तच चिरलेली कोथिंबीर घ्यायची. खोबर करंज्यांसाठी भाजतो तस मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यायच म्हणजे मस्त कुरकुरीत होत. खसखस, तीळ पण खमंग भाजून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे पण फार बारीक व्हायला नकोत. तेलावर ठेचलेला लसूण परतून घ्यायचा आणि त्यावर चिरलेला कांदा परतून गुलाबी करून घ्यायचा.तोवर सुक खोबर, खसखस आणि तिळकूट, कोथिंबीर, मीठ, तिखट मिक्स करून घ्यायच आणि कांदा लसूण परतून गार झाल्यावर ते पण ह्या सारणात मिक्स करून घ्यायच.आता वड्यांसाठी कढईत थोडस तेल तापवून त्यात पाव चमचा तिखट, थोडी हळद आणि अर्धा चमचा धनाजीरा पावडर घालून लग्गेच दीड कप पाणी घालायचे. पाण्याला उकळी फुटली की चवीप्रमाणे मीठ घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यात एका हाताने बेसन सोडत दुसऱ्या हाताने डावाच्या मागच्या बाजूने हाटत रहायचे. बेसनाची गुठळी व्हायला नको इतकं पीठ फास्ट हाटायच. हाटून जमत नसेल तर आधीच एका वाटीत बेसन थोड्या पाण्यात कालवून त्याची पेस्ट रेडी ठेवायची आणि फोडणीच्या पाण्याला उकळी आली की त्यात ती पेस्ट हळूहळू चमच्याने ढवळत सोडायची. एन्ड रिझल्ट मध्ये बेसनात गुठळी दिसायला नको. बेसन नीट हाटून झालं की झाकण घालून दोन मिनिटं वाफवून घ्यायच. तेव्हढ्या वेळात बेसन शिजून त्याला गुळगुळीतपणा आणि चिकटपणा जाणवायला लागतो.बेसनाचा गोळा होऊन मिश्रण सुटायला लागलं भांड्यापासून की मिश्रण रेडी आहे असं समजायचं ( मिश्रण फार कोरड व्हायला नकोय नाहीतर वड्या मोडतील, थापता येणार नाहीत)
वड्या करण्यापूर्वीच एका वाटीत पाणी आणि एका वाटीत चमचाभर तेल काढून हाताशी ठेवा.आता एक ताट उपड घालून त्यावर ओल सुती कापड पसरवून त्या कपड्याला परत पाण्याचा हात लावून घ्या. मग त्या शिजलेल्या बेसनातून थालिपीठासाठी घेतो तितकं पीठ त्या कपड्यावर घेऊन तेलाच्या हाताने ते गरम असतानाच थापा, फार पातळ थापू नका  68 नाहीतर वड्या मोडतील. मग त्यावर सारण पसरवा, हाताने सारण नीट दाबून बसवा.सुरळीच्या वड्या करतो तशीच गुंडाळी करायची आहे इथे पण फक्त स्टफ असेल हे प्रकरण आणि म्हणूनच नाजूक आणि म्हणून फारतर फार 3 गुंडाळया करता येतील Vaitag मला दोनच गुंडाळया जमल्या. खरतर मला ही प्रोसेस सांगता येणार नाहीये तरी मी तुम्हाला कन्फ्युज मात्र नक्की करेन Heehee तर आता वड्या बनवण्यासाठी तुमच्याबाजूचा कपडा उचलून आतल्या थापटपोळीची एक गुंडाळी करा,गुंडाळी नीट बसली की परत कपडा सोडत अजून एक गुंडाळी करा, दुसरी गुंडाळी करताना सारण बाहेर येणार नाही ते बघा.आता समोरच्या बाजुने कपडा उचलून रोल उभा करा म्हणजे गुंडाळीच्या दोन्ही बाजूने कपडा असेल,वरच्या बाजूने दाबून कडा जोडा व त्या गुंडाळीला माश्याचा आकार द्या. कपडा काढून गुंडाळी उचलून दुसऱ्या ताटात ठेवा आणि गार झाली की वड्या कापा.
टीप- वड्या करताना बेसन गरम च हवंय , कोमट झालं तरी वड्या तुटतात,चिकटत नाहीत म्हणून फार फास्ट कराव्या लागतात वड्या आणि ते शिजलेल बेसन झाकून ठेवावे लागत. रस्सा पण पातळ ठेवावा, खाताना वडी रसयात घालुन चुरून घेतात तेव्हा सारणामुळे रस्सा दाट होतो.
आता ताटात भाकरी, कांदा, दही, रस्सा आणि वड्या घेऊन उभा आडवा हात मारत हाशहुश करत बसावं :ड

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle