काश्मीर -ट्युलिप फेस्टिवल व्हिजिट आणि इतर भटकंती
एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात श्रीनगरच्या ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिप फेस्टिवल असतो. लेकीची दहावीची परीक्षा संपत असल्यामुळे लॉंग ब्रेकमध्ये काश्मीर ट्रिप करायची हे ठरलेलं होतच तर ट्युलिप फेस्टिवल कव्हर होईल अशी वेळ ठरवून आम्ही टूर आखली आहे.
वैष्णोदेवी, पेहलगाम, गुलमर्ग,सोनमर्ग, श्रीनगर आणि मुख्य आकर्षण - फुललेली ट्युलिप गार्डन :dhakdhak: असणार आहे.
ह्या सर्व ठिकाणी काय काय बघावेच, कुठे शॉपिंग करावी, काय करू नये असे सगळे सल्ले द्या.
मुंबई ते जम्मू आणि श्रीनगर ते मुंबई बाय एअर प्रवास असणार आहे आणि वैष्णोदेवी दर्शनासाठी पण हेलिकॉप्टर बुकिंग दोन्ही वेळेसच झालं आहे.
कटराला दुपारी 1 पर्यंत पोहोचल्यानंतर वैष्णोदेवी दर्शन दुसऱ्या दिवशी आहे, तर कटरा मध्ये मार्केट आहे का किंवा अजून काही बघण्यासारखं आहे का ?