हा एक चिवड्याच प्रकार आहे. मी लग्नानंतर पहिल्यांदा हा पुड-पोहे प्रकार माझ्या मावस सासूबाईं कडे खाला होता.
माझ्या सासूबाई पण मस्त करायच्या हे पोहे.
काल सहज आठवण आली ह्या पोह्यांची आणि नवर्याच्या सुचने प्रमाणे केले गेले हे पोहे / चिवडा
साहित्यः
-१ किलो पातळ पोहे
- पाऊण ते एक वाटी कारळ-जवसा ची पूड (भाजून आणि नंतर मिक्सर मध्ये काढून. कारळ जरा जास्त घ्यायच जवसा पेक्षा)
- पाऊण ते एक वाटी मेतकूट ( हे जितक खमंग असेल तितके पोहे मस्त होतात )
- शेंगदाणे
- डाळवं
- खोबर्याचे काप
- तिखट, मीठ, हळद, सुकी लाल मिरची
- कडिपत्ता
कृती
- कढई मध्ये पातळ पोहे मंदाग्नी वर छान कुरकुरीत भाजून घ्यावे ( पातळ पोह्याच्या चिवड्याला करतो तसे)
- थंड झाल्यावर त्यावर पूड आणि मेतकूट टाकुन हाताने नीट पसरावे
- त्याच कढईत फोडणी साठी तेल गरम करून त्यात मोहरी, कडिपत्त्ता, सुकी लाल मिरची, हळद, तिखट टाकाव (तिखट चवी प्रमाणे)
- त्यात शेंगदाणे टाकून परतावे मग क्रमाणे डाळवं आणि खोबर्याचे काप टाकावे ( हे सगळं चिवड्या सारख चं)
- ह्या फोडणी मध्ये पातळ पोहे टाकावेत
- फोडणी, पुड, आणि मेतकूट सगळी कडे व्यवस्थित लागेल असं छान मिक्स करून परतायचं आणि २-३ मिनीटानी गॅस बंद करायचा
पुड आणि मेतकूट अजून टाकलं असत तरी चाललं असत असं वाटल नंतर. पण चव मस्त आली होती.
ह्या वर बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून मस्त लागतं
माझ्या सासूबाई कधी कधी फक्त कारळाची पुड घालायच्या जवस नाही. ते ही छान लागतं