दुधीच्या सालीची चटणी

दुधी वापरून झाल्यावर साल वाया जाऊ द्यायची नसल्यास ह्या पद्धतीने चटणी करुन बघता येईल.

साहित्य-
सगळं अंदाजे आहे.
मी दोन दुधींच्या साली धुवून वापरल्या.
अंदाजे दोन ते तीन टीस्पून तीळ,
दोन तीन टीस्पून सुक्या खोबर्‍याचा कीस
अर्धा चमचा जिरं
एक चमचा तेल
दोन तीन टीस्पून दाण्याचं कूट किंवा तेवढं कूट होण्याइतके दाणे
चवीपुरतं मीठ, साखर, लाल तिखट.

कृती-

दुधीच्या साली कात्रीने कापून मध्यम तुकडे करावेत.
तेलावर जिरं घालून फोडणी करावी. त्यात तीळ परतावेत.
त्यावर दुधीच्या साली घालून परतत राहवं. त्यावरच खोबर्‍याचा कीसही घालावा. त्यावरच चवीपुरतं मीठ, तिखट, साखर घालून
गॅस बंद करुन गार होऊ द्यावं. मग मिक्सरला फिरवताना अख्खे दाणे घालावेत किंवा दाण्याचं कूट घालावं.
झाली चटणी तयार. अशीच पडवळाच्या सालींचीही करता येते.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle