साहित्य- कुरडयांचा चुरा, कांदा, तेल, लाल तिखट, हिंग, मीठ
कृती- कुरडयांचा चुरा भरपूर गरम पाण्यात भिजवून ठेवायचा. मग लगेच जरा सढळ हाताने तेल घेऊन उभा चिरलेला कांदा त्यात परतायचा. कांदा पण जरा जास्तच घ्यायचा. लाल तिखट, हिंग घालायचं. कांदा मौ झाला की कुरडया निथळून त्यात घालायच्या. झाकण ठेवून, अधूनमधून परतायच्या. मौ शिजेतो पाण्याचे हबके मारायचे. चवीनुसार मीठ घालायचं.
मग कोथिंबीर आणि हवं तर लिंबू. नाक सूं सूं करत खाण्याइतपत तिखट करायची. पोळी अथवा भाताबरोबर पण छान लागतं.
वाढणी प्रमाण - खाल तसे.
माहिती स्रोत - ऑफिसमधील कलीग. खरंतर त्याची आई. काकू फार चविष्ट करतात हा पदार्थ. आणि मला आवडते म्हणून ही भाजी केली की वेगळ्या डब्यात द्यायला लागल्या होत्या नंतर :)