एक विलक्षण अनुभव - होमलेस किड्स कॅम्प - भाग १

माझ्या आयुष्याला वळण देणार्‍या या करिअर मधे आल्यापासून मला एकेक अनुभव घडवत गेले आहेत.

हा मात्र विलक्षण आणि काळजाला चटका लावून गेला. फेब्रुवारीमधे मला डिस्ट्रीक्टच्या मेन मॅथ हेडचा टेक्स्ट आला. ' गौरी दे आर कन्सीडरींग यु टू टीच अ कॅम्प फॉर होमलेस किड्स. यु विल हॅव टू गिव्ह अप युअर फॅमिली टाईम अँड स्प्रिंग ब्रेक दो. लेट मी नो. यु आर द राईट पर्सन दो'. मला एकदम भरुन आलं. 'होमलेस किड्स? मला त्यांना रिलेट करता येईल का? लेक घरी यायचाय त्याच चार दिवसांत' एकेक प्रश्न येत राहिले डोक्यात. पहिला लेकाला फोन लावला' आई , आय नो व्हेअर युअर हार्ट इज. गो फॉर इट. आपण इव्हिनींग्जला टाईम स्पेंड करुया'त्या बाजूने शांत झाले.

तिला टेक्स्ट केला' आय एम इन. लेट मी नो व्हेअर अँड व्हेन आय विल बी देअर'.

स्प्रिंग ब्रेकच्या आदल्या दिवशी मिटींग झाली आणि निवडले गेलेले बारा लोक जमले.आम्हाला कामाचं स्वरुप समजावलं गेलं. मी मॅथ हेड होते फिफ्थ ग्रेडसाठी आणि दोन टीचर्स मला हेल्पला. अशा चार टीम्स होत्या. आम्हाला सांगण्यात आलं ही मुलं खूप वेगवेगळ्या अनुभवातून गेली आहेत. हार्डशिपमधून जात आहेत त्यामुळे खूप विचारपूर्वक आम्ही ही टीम निवडली आहे. ह्या मुलांना प्रेम द्या, व्हॅल्युज द्या आणि स्प्रिंग ब्रेकचा आनंदही द्या.मला आता चांगलीच जबाबदारी आली मनावर. पण एक वेगळंच फिलींग येत होतं.ह्या मुलांना कसा स्प्रिंग ब्रेकचा आनंद देता येईल ? काय काय अ‍ॅक्टीविटिजनी त्यांना मजा येईल.बिहेविअर कसं सुधारता येईल?

या सगळ्या विचारात झोप लागली. पहिल्या दिवशी मिटींग आणि टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटिज होत्या. आणि क्लासरुमही सेट करायच्या होत्या. सकाळी पोचल्यावर आमचं जोरदार स्वागत करण्यात आलं.प्रत्येकाची ओळख करुन दिली तीही वेगळ्या पध्दतीने. सगळ्यांना एका सर्कलमधे उभं केलं आणि एकाच्या हातात मोठा बॉल दिला. तो बॉल ज्याच्याकडे फेकला जाईल त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. प्र्त्येकाला वेगवेगळ्या प्रकारे एकच प्रश्न विचारला जात होता' हाऊ विल यु मेक अ डिफरंस इन वन स्टुडंट्स लाईफ इन थ्री डेज? मला हाच प्रश्न विचारला गेला आणि माझ्याकडून उत्तर गेलं' बाय रिचींग दॅट स्टुडंट व्हेअर ही/शी इज अँड टीच. अँड गिव्ह दॅट स्टुडंट दॅट केअर अँड कॉन्फिडंस दॅट ही/शी नीड्स' उत्तरानं मला समाधान मिळालं होतं.आता मला तीन दिवसांचं गोल मिळालं होतं.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle