देवराई आर्ट व्हिलेज - पाचगणी

या वेळच्या महाबळेश्वरच्या ट्रिपमध्ये देवराई आर्ट व्हिलेजला भेट द्यायचीच हे ठरवलं होतं. त्याप्रमाणे एका संध्याकाळी तिथे गेलो.

व्हिलेज जरी नाव असेल तरी ते व्हिलेज वगैरे नाहीये. हे एका एनजीओ चं नाव आहे.

56af39f0-0be7-4b96-b192-86421b336ada.jpg

मंदाकिनी माथूर या ग्वाल्हेर मधून येऊन गेली १० वर्षं पाचगणीत ही संस्था चालवत आहेत. छत्तिसगड आणि गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागातील आदीवासी मुलांच्यातून आर्टिस्ट शोधून त्यांना इथे आणून, एका वेगळ्या कलेचं शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्यास ही संस्था मदत करते. ही कला आहे ढोकरा आर्ट म्हणजे ओतीव पितळेच्या वस्तू घडवणे.

मुख्य बंगल्यात एक म्युझियम कम विक्रीकेंद्र आहे. आम्ही गेलो तेव्हा दुपारची वेळ होती आणि बाकी कोणीच भेट द्यायला आले नव्हते. केंद्रात एक लहान पण चुणचुणीत मुलगी होती तिने आम्हाला सर्व माहिती दिली. अक्षरशः आवाक होण्यासारखे एक से एक प्रकार होते तिथे.

दगड / लाकूड / माती + धातू असं फ्युजन करून अतिशय सुरेख वस्तू बनवल्या आहेत. काही तर मूळच्या नैसर्गिक वस्तू जशा मिळाल्या तश्याच्या तश्या धातूच्या ठश्यात घालून अमर करून टाकल्या आहेत.

या खालील फोटोतील सर्व अविष्कार केवळ बघता येतात. हे विक्रीसाठी नाहीत. कारण विविध प्रयोग करताना या वस्तू सर्वप्रथम बनवल्या गेल्या आणि म्हणून त्या केंद्रातच ठेवल्या आहेत. दारातून आत शिरताच डाव्या बाजूच्या एका फळीवर या कलाकृती ठेवल्या आहेत.

या फोटोत दाराशेजारीच वरची जी फळी दिसतेय त्यावरच्या कलाकृती विक्रीसाठी नाहीत :
89fb1f28-93bc-48ff-a087-54bdc18514b6.jpg

ही धातु+दगड यातून जन्मलेली देवता:

खर्‍याखुर्‍या शेंगा घेऊन त्यावर मातीचं लिंपण करून त्यात धातू ओतून मग भट्टीतून जाळल्यावर मूळ वस्तूचा जशाच्या तसा ठसा उमटला आहे. ही शेंग कुठल्या झाडाची आहे? नाव काय? माझ्या घरी आहे ही पण नाव नाही माहित. अजून काही शेवग्याच्या शेंगा होत्या पण फोटो नाही काढला गेला बहुतेक :
ab9e9ddf-5a41-4476-9223-c23567d10cb8.jpg

हे एक आणखी वेगळंच भन्नाट प्रकरण. रानात मिळालेली माकडाची कवटी आणि रस्त्यावर सापडलेला गाडीखाली चिरडून मेलेला बेडुक घेऊन त्यांनाही ठशात गोठवून ठेवलं:
dbc69667-bdc1-4f00-bf4c-3912b686c4bb.jpg

दगडाचे पेपरवेट आणि कासवं :
c20c2b8c-72ce-4e77-947f-a9b30ed66aed.jpg

दगडातून आकार शोधून बनवलेले प्राणी - गायी, हरणं वगैरे. त्यांची देहबोली किती तंतोतंत अस्सल उमटलीये. लहानपणापासून आजूबाजूला प्राणी बघतच वाढलेल्या कलाकारांनी हे प्राणी किती उत्तमरित्या वाचले आहेत त्याची ही पावतीच :

0c0b56d6-6d21-4eeb-9764-528997736d17.jpg

62a5c513-ffa2-480e-8ac0-739937b8d40f.jpg

96aeee0a-f571-4acd-b4ab-48da74c81454.jpg

90e5bb45-de69-498c-83d3-c8eb0bc07781.jpg

e736c12b-2d27-41e7-b4dd-603a314b4e64.jpg

या इतर काही कलाकृती :

0dd7d483-8744-4729-bb6d-49108fdb3b3c.jpg

1200fa6e-a14a-4d4f-9cde-c44dd91d83cb.jpg

4821e9df-b416-42ce-8a75-25cf581514e2.jpg

5837c765-ab9a-424e-b276-10ddb93785e8.jpg

419994d9-38a4-4b3c-a41e-d3bd86325824.jpg

816586d0-1e66-44fd-8fbf-3617ac914a10.jpg

c7a3430c-4c58-46d2-a331-9aa2afcefefd.jpg

c50b82af-d479-409e-b55e-f2b0f9ae8f4a.jpg

ca4e4b3f-1fe1-43d8-933c-27646b997220.jpg

f802f2a6-f199-4113-992d-e9e170495637.jpg

fa7fec6d-8a6d-4df1-86a6-53f226beb56d.jpg

41d0ce11-d9ec-45c5-835b-e2d85f800521.jpg

0778f079-dbfa-4d0f-af6b-0a87a22a532b.jpg

2019ff00-5dc2-4d8f-b491-0d41c331a57b.jpg

a0a0e1f5-5e0f-466f-9ed4-010e9fc50c05.jpg

हा छोटासा हौद किती सुंदर आहे. त्यात पाणी भरून फुलं सोडली की तळ्याकाठी ध्यानस्त असलेला ऋषी किती मस्त दिसेल ना? असा मी सिरॅमिकचा हौद बनवेन असं ठरवलंय मनात.
7ea46939-391d-4d1d-80ff-47e7fc32c2ce.jpg

या तोल साधणार्‍या कलाकृती :

झाडावरच्या पक्षी + त्याच्या दोन बाजूच्या २ घंटा एका छोट्याश्या टोकावर तोल साधून राहिल्यात. या उचलता येतात. फारच कौशल्याचं काम.
1943bf84-9762-4b36-b266-b1548670383d.jpg

25b08e15-fda8-447e-be12-65b77b769da5.jpg

ही तिथली सर्वात मोठी कलाकृती. अशीच तोल साधणारी आणि तोल साधण्याचा संदेशही देणारी. माणसाच्या एका पायाची बोटं आहेत तिथे ती वरून ठेवलेली आहे. शिवाय न पडता ही त्या बिंदूवर गोलही फिरते. फारच कल्पक!

de91fc05-52f5-4b3f-9f1f-856771987462.jpg

खरंखुरं शिंग वापरून केलेली कलाकृती :

5bde68ae-db3e-42df-a04f-11013beaba73.jpg

हे दुधी वाळवून, पोखरून त्यावर जळक्या काडीनं नक्षी कोरून बनवलेले दिवे :

04e77578-25c7-40b6-965d-6cfed9aa74e6.jpg

b2090238-c883-486e-9136-62748a3ae309.jpg

किंमती जास्त वाटल्या तरी एकदा त्यांच्या वर्कशॉपला भेट देऊन एकेका कलाकृतीमागची कला, श्रम आणि वेळ लक्षात घेतलं तर मग किमती पटतात. विक्रीकेंद्रा शेजारी असलेल्या पायर्‍या अन पायवाट घेऊन जरा खालच्या पातळीवर उतरून गेल्यावर तिथे एका मोठ्या झाडाखाली अनेक आदीवासी आर्टिस्टस कामात मग्न असलेले दिसतील.

केंद्राशेजारचा मोर आणि दगडावरची नक्षी :

8405313c-b0e4-4491-8b67-80f222263462.jpg

48f42e22-47a6-4857-8637-a8b7f069d568.jpg

पायवाटेनं खाली जाताना :

98a00fe4-9ec0-4363-9f1f-aca8cc7a6d70.jpg

ce6cbe5a-23c7-477c-aa4a-394daf93dd4b.jpg

516cf8b3-56f8-46e4-aaf2-e787116daa98.jpg

देवराई अनेक ठिकाणच्या प्रदर्शनांतून भाग घेते. काळा घोडा फेस्टिवलमध्येही नेहमी भाग घेते. शिवाय पुण्यामुंबईच्या काही दुकानांतून त्यांच्या कलाकृती विकायला ठेवल्या आहेत. शिवाय कोणाला ही कला शिकायची असेल तर त्यांचे कोर्सेस आहेत. शिक्षक म्हणजे ही आदिवासी मुलंमुलीच असतात.

आम्ही त्या कलाकारांशी बोललो. काही छत्तीसगडचे तर काही मुली गडचिरोलीच्या होत्या. एक मुलगा गेली पाच वर्षं इथेच रहात आहे. हे मुलं मुली जवळपासच्या गावांतून भाड्यानं रहातात आणि दिवसभर इथे केंद्रात येऊन कलाकृती घडवतात. सगळे मस्त गप्पा मारत एकीकडे हात चालवत होते. एकानं वाळलेल्या पानाचा ठसा नुकताच भाजून काढला होता तो दाखवला. खरंखुरं अर्धवट तुटलेलं पान पण फक्त पितळेचं.

435d98ee-92e3-4618-85ad-862c9275133e.jpg

एकजण एका ऑर्डरकरता एका पुतळ्याच्या फोटोवरून तसाच्या तसा ३-डी पुतळा मेणात घडवत होता. २-डी वरून ३-डी ... सोपं काम नाहीये. या कलाकृतीचा फोटो घ्यायचा राहिला. Sad

काही मुली मातीच्या भाजलेल्या कपांवर मेणानं बारीक नक्षी काढत होत्या. मेणाचं काम झालं की मग त्यावर मातीचा एक पूर्ण कप झाकणारा थर दिला जातो. हे काम दोन मुली करत होत्या. या मातीच्या थरावर भुसा घातलेल्या मातीचा अजून एक थर दिला जातो आणि मग भट्टीत भाजतात. या दोन्ही थरांना एक भोक ठेवतात - हा आउटलेट. मेणामुळे पहिल्या मातीच्या थरावर नक्षी उमटलेली असते. भट्टीत भाजल्यावर आतलं मेण वितळून आउटलेटमधून बाहेर येतं. मग त्यात धातूचा वितळलेला रस ओततात आणि पुन्हा भाजतात. शेवटी वरचे दोन मातीचे थर काढून आतला माती+धातूची नक्षी वाला कप तयार होतो. अशी ढोबळ क्रिया आहे. या व्हिडिओत तुम्हाला अधिक व्यवस्थित कल्पना येईल : https://www.youtube.com/watch?v=ffg07yxr_Vs

आम्ही प्रत्येकाला पगार नाही विचारत बसलो पण जो मुलगा छत्तीसगडवरून येऊन इथे गेली पाच वर्षं रहात आहे, त्याला दर महिन्याला साडेसात हजार रुपये पगार मिळतो. बाहेर राहून, खाऊन हातात कितीसे उरत असतील? असा विचार मनात आला. साडेसात हजार कमी वाटले.

शिवाय आणखी एक गोष्ट जरा खटकली ती म्हणजे या कलाकारांची नावं कुठेच पुढे येत नाहीत. ते ज्या वस्तू निर्माण करतात त्या एनजीओच्या नावानं विकल्या जातात. मग हे पुढे कसे येणार? स्वतंत्र नाव कसं कमावणार ? या प्रश्नांची काही समर्पक उत्तरं असतीलही पण ती जोवर मिळत नाहीत तोवर हे प्रश्न मनात राहतील.

आम्ही एक दुधीपासून बनवलेला लँप आणि शुद्ध मधाची एक बाटली विकत घेतली.

9f056c88-82c4-4fac-bd95-3550b6f5b5e5.jpg

fb4bd453-b148-4d8c-8f0e-4f5a2aef479a.jpg

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle