[3/31, 10:52] Rashmi: 14 ऑक्टोबर 2005 ते 12 मार्च 2006 या काळात नर्मदा परिक्रमा पायी करणाऱ्या भारती ताई ठाकूर आपल्याला त्यांच्याच 'नर्मदापरिक्रमा एक अंतर्यात्रा ' या प्रवासवर्णनातून परिचित आहेत.
एका सुखवस्तू कुटुंबातील
व संरक्षण खात्यात चांगली नोकरी करणाऱ्या ताईंनी 2009 साली स्वेच्छा निवृत्ती घेतली व स्वतःसाठी जगणे सोडून नर्मदेच्या तीरावरील शिक्षणापासून वंचीत मुलांसाठी कार्य सुरू केले.
गरिबी ,अज्ञान ,कुपोषण याने पिचलेलया कुटुंबात मुलांना शाळेत न घालता शेती,पशुपालन, घरकाम व लाकूडफाटा गोळा करणे अशा कामांना लावून शालेय शिक्षणापासून वंचीत ठेवले जाते आहे हे त्यांनी जाणले होतेच.
प्रत्यक्ष काम सुरू झाले,ते मध्यप्रदेशात निमाड प्रांतातील मंडलेश्वर येथे एक खोली भाड्याने घेऊन रोज 16 किलोमीटर पायी चालत जाऊन 'लेपा' येथे.लेपा येथील 6 मुलांना त्या शिकवू लागल्या ,आता 1700 मुले शिकत आहेत.कुपोषित मुलांस अभ्यासात रुची निर्माण व्हावी म्हणून माध्यान्ह सकस व गरम भोजन मुलांना दिले जाते.नर्मदालय या संस्थेचा प्रवास समाजाच्या पाठबळावर व स्वतः भारती ताईंच्या तन मन धन या बळावर होत आहे.शुभदाताई,राघव,दिग्विजय,गोलू,शँकर,यांसारखे सहकारी त्यांना लाभले आहेत.
या ज्ञानयज्ञातून सुरेख पैलूदार हिरे घडत आहेत.
संस्थेने स्वतःची गोशाळा राखून त्या गुरांची देखभाल मुले करतात,अगदी गाईचे बाळंतपण सुद्धा.. मुले संस्थेतील फर्निचर उत्तम बनवतात,भगवद्गीतेतील अध्याय शुद्ध म्हणतात,संस्कृत स्तोत्रे गाऊन दाखवतात.शास्त्रीय संगीत सुरेल गातात, राघव तर कमर्शिअल पायलट असून संस्थेचे कार्य सांभाळतात, राघव व शँकर यांचा सोलर ड्रायर वरील शोध निबंध सातासमुद्रापार पोर्तुगाल येथे 80 देशांच्या प्रतिनिधींसमोर सादर केला गेला.
संस्थेतील स्वच्छता,स्वयंपाकघर,गोशाळा ,लक्ख ठेवण्यात सगळ्यांचा सहभाग असतो.
मुले रझया,पिशव्या,स्कार्फस,विणकाम,भरतकाम केलेल्या वस्तू यांच्या प्रदर्शनातून व विक्रीतून संस्थेच्या खर्चास हातभार लावतात. संगणक,विज्ञान,प्रयोग,जीवन शिक्षण,स्वावलंबन,व औपचारिक शिक्षण यांच्या सुंदर मिलाफातुन एक आदर्श अभ्यासक्रम भारती ताईंनी निर्माण केला आहे.
दुर्गम अशा आदिवासी भागात 27 मुलांसाठी सरदार सरोवरातील धरणात आजही किमान 5 तास नावेत प्रवास करून जावे लागते. अशा मुलांसाठी संस्था निवास,भोजन,शिक्षण या सगळ्यांचाच खर्च करते.
अशा ज्ञानज्योति उजळवून भारती ताईंनी समाजबांधवांचे व गरिबांचे ऋण फेडायचे व्रत आचरून दाखवले आहे.तमाकडून तेजाकडे जाणारे हे इवले दिवे पाहून नर्मदेच्या पात्रात सोडलेल्या दिव्यांचा प्रवास डोळ्यासमोर येतो ,सगळ्या खडतर प्रवासात या प्रकाशाच्या इवल्या दिपांना हळुवारपणे पण भक्कम आधाराचा हात देत आहेत भारती ताई. नर्मदे हर।।
रश्मी भागवत।।
[3/31, 11:43] Rashmi: पत्ता - नर्मदालय, 149, लेपा पुनर्वास, तहसील कसरावद, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश पिन कोड 451228
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle