मैत्रिणींनो, मी नुकतीच खजुराहो ला जाऊन आले. तेथील 'शार्दूल' ह्या शिल्पा बद्दल मी फेसबुक वर टाकलेली हि पोस्ट तुमच्या बरोबर शेअर करतीय.
"शार्दूल"
मी पहिल्यांदाच फेसबुकवर लिहण्याची हिम्मत करतीय. हिम्मत ह्यासाठी की मला माहित आहे की, मी काही लेखिका वैगेरे नाहीये आणि ऑलरेडी इथे इतकी तज्ञ लोकं आहेत की मी फक्त त्यांचं वाचन करणं पसंद करते.
पण सध्या आजूबाजूला जे घडतय त्याने मन सुन्न झालय. घाबरू नका ह्यावर बऱ्याच लोकांनी ह्या दोन दिवसात भरपूर लिहलय आणि तेच परत लिहणार नाहीय.
दोन आठवड्यांपूर्वी खजुराहो ला जाण्याचा योग आला. हजारो वर्षांपूर्वीची तिथली मंदिर आणि त्यावरची कलाकुसर बघून थक्क झाले. सगळीच शिल्पं खूप सुंदर आहेत पण त्यातील मला सर्वात जास्त आवडलं ते 'शार्दूल' चं शिल्प.
ह्या शिल्पात मधली बॉडी सिंहाची पण डोकं मात्र घोडे, हत्ती ह्याचं आणि दिसताना ड्रॅगन सारखं दिसतं. त्याच्या तोंडाजवळ एक स्त्री आणि पायाजवळ एक पुरुष व त्याचा हातात अस्त्र असं दाखवलय. तिथल्या गाईड ने सांगितलं की, बहुतेक सगळ्यांना खजुराहो म्हटलं की फक्त तिथली शृंगारिक शिल्पच डोळ्यासमोर दिसतात पण ती शिल्प, टोटल शिल्पांच्या 10% पण नाहीत. आणि शार्दूलचं शिल्प मात्र मंदिराच्या बहुतांश भागात आहे.
त्याने शार्दूल शिल्पाचा अर्थ सांगितला की, तो ड्रॅगन हे इच्छेचं, लालसेचं प्रतीक आहे आणि त्याने फक्त त्याच्या इच्छेखातर त्याच्या तोंडाजवळ असलेल्या स्त्रीला, तिच्या इच्छेविरुद्ध मिळवण्याचा प्रयत्न केला तर पायाजवळ बसलेला पुरुष त्याच्या अस्त्राने त्या ड्रॅगन चा खात्मा करणार.
हजारो वर्षांपूर्वी ह्या शिल्पाद्वारे किती छान मेसेज दिला होता..
ती मंदिर बघतांना सारखा डोक्यात विचार येत होता की, अरे आता कुठे गेले हे कारागीर ज्यांनी ही एवढि भव्य दिव्य मंदिर उभी केली. आता का होत नाही अशी निर्मिती.
पण ह्या दोन दिवसांपासून डोक्यात विचार येतोय की, जसे ते कारागीर काळाच्या ओघात लोप पावले तसेच त्या इच्छारूपी ड्रॅगनच्या पायथ्याशी बसलेला, स्त्रीचे त्याच्यापासून रक्षण करणारा पण काळाच्या ओघात लोप पावला असेल का ?
width="211" height="480" alt="30704671_2179485552078688_7302375912887025664_n.jpg" />