कोल्हापूर म्हणजे अंबाबाई, जोतीबा, पन्हाळा हे ठरलेले आहे.
पण कोल्हापूरपासून १२-१३ किमी वर असलेला आणि पुणे-बेंगलोर हायवे पासून ४ किमी अंतरावर असलेला हा सिध्दगिरी कणेरी मठ पण नक्की पहावा , मुलांना दाखवावा असाच आहे. आता आजकाल ह्याचा बराच प्रचार झालेला आहे , पण अगदी लांबच्या लोकांना कदाचित माहित नसेल म्हणून इथे नोंदवून ठेवत आहे. अतिशय रम्य परीसर आहे. मी बघून काही वर्ष झाली खरतर ... आणि थोडे गडबडीत होतो , पण नक्की वेळ काढून परत जावे असे ठरवले आहे.
असे म्हणतात , हा मठ १२०० वर्ष जुना आहे आणि तिथे शंकराचे मंदिर होते. इथे आता एक म्युझियम उभे केलेले आहे. पूर्वीची खेड्यामध्ये सर्रास आढळणारी बारा बलुतेदार पध्दती मेणाच्या पुतळ्यांनी साकारली आहे. खूप बारीक सारीक बारकावे टीपले आहेत. पुतळे इतके जिवंत वठले आहेत. लहान मुलांना तर मजा वाटतेच , पण आपण पण काही गोष्टी नव्याने बघतो
खालील माहिती आंतरजालावरून साभार:
हे म्युझियम ७ एकर जागेत पसरले आहे , जवळपास ८० खेड्यातली द्रूश्ये, ३०० खरीखुरी वाटणार्या पुतळ्यांच्या सहाय्याने साकारली आहेत.
पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेले १२ उद्योगधंदे व १८ पूरक उद्योग दाखवले आहेत.
माझ्याकडे असलेले फोटोज सापडत नाही आहेत , पण "kaneri math" असे गुगल केल्यास बरेच फोटो मिळतील. कॉपीराइट इश्युमुळे मी इथे टाकले नाहीत
त्यांची वेबसाइट : http://www.kolhapurtourism.org/our-destination/siddhagiri-museum/
तिथे एक रेस्टॉरंट आहे , पण आम्ही गेलो नव्हतो त्यामुळे कसे मिळते त्याची कल्पना नाही.
वेळ : सकाळी ९- संध्याकाळी ६
फी : मोठ्यांना रु १०० , लहान रु. ५०
ट्रीप अॅडव्हायजर चा रेव्यु
https://www.tripadvisor.com/ShowUserReviews-g737166-d3475528-r489264208-...