सध्या आमच्या घरात क्राफ्टींग प्रोजेक्टचे वारे वाहत आहेत.लेक (वय वर्षे ३.३ ) शाळेत वेगवेगळे क्राफ्ट्स करायला लागल्या पासून घरी सुद्धा रंगीत पेपर, ग्लू, कलर्स घेऊन 'मी प्रोजेक्ट करतेय' असं म्हणत आकार कापणे , रंगवणे,चिकटवणे असं काही तरी करत असते. घर आवरताना एक पॅकेजिंगचा कार्ड्बोर्ड सापडला. त्याचा शेप इंटरेस्टींग वाटल्याने जपून ठेवलेला. नेमला लेकीच्या हातात आला.तीने तो कशाचा आहे हे विचारल्यावर मी ह्याचा प्रोजेक्ट करायचा आहे असं सांगितलं . मग आम्ही दोघींनी मिळून केलेला हा आमचा छोटासा प्रोजेक्ट :)
वापरलेल्या वस्तू :
बेस - ज्युसरच्या पॅकेजिंगचा कार्डबोर्ड
घरे - पेपर रोल आणि कार्ड पेपर
झाडे - पेपर रोल आणि प्लॅस्टिक बॉटल
बेस करता ब्लू कलर देण्यात आल्याने प्रोजेक्टचे नामकरण वॉटर सिटी असे करण्यात आले आहे . आणि सोबतीला एक छोटीशी होडी बनवून ठेऊन दिली. :)